कोल्हापूर : मधुमेहाचे टाइप 1 डायबेटीस या मधुमेहाच्या प्रकारापासून बरेच जण अनभिज्ञ आहेत. मात्र या विकाराचेदरवर्षी 50 ते 60 हजारतरूण-तरूणींचाकेवळ निदान न झाल्याने जीव गमवावा लागतो. पालकांना आपलेपाल्य या विकारानेग्रस्त्त असल्याचे लक्षात येत नाही. या विकाराबद्दल डॉक्टरांना माहितीअसतेपरंतू याचे निदान लवकर होत नाही. कोल्हापूरातील फिटनेस तज्ञ गणेश इंगळे आता या विकाराविषयी मोफत मार्गदर्शन करणार आहेत. टाईप 1डायबेटीस नियंत्रणात येऊ शकतो. परंतू यासाठी योग्य मार्गदर्शन व सल्ला मिळणेआवश्यक असल्याचे गणेश इंगळे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
इंगळे यांनी गेली दहा वर्षे सातत्याने टीआयडी ची माहिती घेण्याचे संबंधित मुलांमुलींची भेटघेवून या विषयीत पशील गोळा करण्याचे कार्य केलेआहे.साखरकमी व जास्त झाल्याने अनुक्रमे हायपोग्लासमिया व हायपर ग्लासमियाचा त्रास होतो. डॉक्टरांचा योग्य सल्ला व इंसुनिलचे डोसेेजतसेच योग्य आहार व व्यायाम,योगसाधना व ध्यचू यांच्या सहाय्याने आनंदी जीवन जगता येणे शक्य आहे. सारखाताप येणे, पोटसाफ न होणे,अति घाम येणे, सारखे लघवीला जाणे,रात्री अंथरूण ओले करणे, डोळ्यांना कमी दिसणेही या विकाराची प्रमुख लक्षणे आहेत. लहान मुलांमध्ये रक्ताच्या चाचणीसह मुत्राची चाचणी केल्यास अचूक निदानकरता येते.
याखेरीज अयोग्य आहार,खाण्यापिण्याकडे पुरेसेलक्ष न देणे यामुळे मुलांमध्ये स्थूलता (चाईल्ड ओबेसिटी)तसेच पुढे टाईप 2 डायबेटीस हे विकार उद्भवू शकतात. शिवाय सतत उदासराहणे व चितांग्रस्त्त असणेही नैराश्येची लक्षणे आजच्या जीवनशैली मुळेवाढत चालल्याचे दिसून येत आहे. उत्साहाचा अभाव असणे, थकवा जाणविणे ,कशातही स्वारस्य नसणे, आत्मविश्वासाचा अभाव असणेही काही प्रमुख लक्षणे दिसून येतात. यासाठी योग्य मानसोपचारतज्ञ व सल्ला औषधोपचार तसेच व्यायाम व योगोपचार यामुळे नैराश्यावर मात करता येते असे गणेश इंगळे यांनी सांगितले.
Leave a Reply