कोल्हापूर: शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेवून, महिलांनी जीवनाचा स्तर उंचवावा, बचतगटाच्या माध्यमातून आर्थिक, स्वावलंबी होतानाच, व्यक्तीमत्व विकासाकडंही लक्ष द्यावं, त्यासाठी चांगली पुस्तकं वाचावीत, असं आवाहन भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा सौ. अरूंधती महाडीक यांनी केलं. शाहूवाडी तालूक्यातील ठमकेवाडी इथं भागीरथी वाचनालयाच्या उदघाटन प्रसंगी त्या बोलत होत्या.
ठमकेवाडी इथं भागीरथी महिला संस्थेच्या वतीनं महिला बचत गटासाठी प्रशिक्षण शिबिर आयोजित केलं होतं. केक, फिनेल, निळ, खाद्यपदार्थ बनवण्याची प्रात्यक्षिकं गंधाली दिंडे यांनी करून दाखवली. या वाचनालयासाठी भागीरथी महिला संस्थेच्या वतीनं सौ. अरूंधती महाडिक यांच्या हस्ते दोनशे पुस्तकं भेट देण्यात आली. महिलांनी बचत गटांच्या माध्यमातुन व्यवसाय करावा. त्यासाठी विविध शासकीय योजनांचा लाभ घ्यावा, संस्थेच्या वतीनं महिलांना पाठबळ दिलं जाईल, असं सौ. महाडिक यांनी नमुद केलं. दरम्यान, रेश्मा माने, सुवर्णा माने यांच्या हस्ते अरूंधती महाडिक यांचा शाल, श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला बाजीराव माने, बाबुराव माने, महादेव तडावळे, लालासाहेब पाटील, बळीराम ठमके, आनंदी माने, सुवर्णा माने, रेश्मा माने, सागर माने यांच्यासह महिला बचत गटाच्या सदस्या, वाचनालयाचे पदाधिकारी उपस्थित होते.
Leave a Reply