

रेडूवर अमाप प्रेम करणाऱ्या प्रमुख पात्राची भूमिका यात शशांक शेंडे यांनी वठवली असून, त्यांच्या विनोदी अभिनयाची अनोखी झलकदेखील या सिनेमाच्या ट्रेलरमधून आपल्याला पाहायला मिळते. जिवापाड जपलेला हा रेडू जेव्हा हरवतो, तेव्हा काय होते? अखेर तो सापडतो का? हे सारे काही या सिनेमात पाहायला मिळणार आहे. तसेच ‘रेडू’ विषयी ग्रामस्थांमध्ये असणारे कुतूहल आणि त्यामुळे उद्भवणारे गमतीदार प्रसंग यात दिसून येत असल्यामुळे, हा सिनेमा प्रेक्षकांचे भरघोस मनोरंजन करणार आहे. संजय नवगिरे यांच्या लेखणीतून सादर झालेल्या या मालवणी भाषेतील सिनेमाचे मंगेश गाडेकर यांनी छायाचित्रण केले आहे.
शशांक शेंडे बरोबरच छाया कदम ही ताकदीची अभिनेत्रीदेखील या सिनेमात पाहायला मिळणार आहे. कोकणच्या मातीचा सुगंध आणि रेडूचा नाद लावणारा हा सिनेमा प्रेक्षकांना मे महिन्याच्या गर्मीत विनोदाचा थंडावा घेऊन येणार हे निश्चित !
Leave a Reply