
एका प्रामाणिक शिक्षकाचा डॉन कसा होतो या धमाल संकल्पनेवर आधारित ‘हृदयनाथ’ हा सिनेमा येत्या रविवारी स्टार प्रवाहवर पहायला मिळणार आहे. या चित्रपटाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर स्टार प्रवाहवर रविवारी (२९ एप्रिल) दुपारी १ आणि सायंकाळी ७ वाजता होणार आहे. या चित्रपटातून जॅकी श्रॉफ आणि आदित्य पांचोली प्रथमच मराठी चित्रपटात एकत्र आले आहेत. तर उर्मिला मातोंडकरचा ग्लॅमरस अंदाज तुमच्या काळजाचा ठोका नक्कीच चुकवेल.हृदयनाथ’ ही गोष्ट आहे तात्या सावंत (जॅकी श्रॉफ) या प्रामाणिक शिक्षकाची. तात्या त्यांची पत्नी आणि मुलीसह गावात रहात असतात.गावात तात्यांविषयी खूप आदराची भावना असते. मात्र, एकदा तात्यांना तीव्र हार्ट अॅटॅक येतो. त्यामधून त्यांना वाचवण्यासाठी एक अवघड हृदय शस्त्रक्रिया केली जाते. ही शस्त्रक्रिया यशस्वीही होते. पण यानंतर तात्यांच्या आयुष्याचा कायापालट होतो. ते नवाब पारकर या कुप्रसिद्ध गुंडासारखे वागायला लागतात. त्यांची भाषा पूर्णपणे बदलते. ते लोकांकडून खंडणी वसूल करायला लागतात. तात्यांचे हे बदललेले वर्तन पाहून सगळेच थक्कं होतात. तीव्र हार्ट अॅटॅक नंतर तात्या कसे वाचतात? हृदय शस्त्रक्रियेनंतर तात्यांचं आयुष्य कसं बदलतं? याची धमाल गोष्ट ‘हृदयनाथ’ या चित्रपटात पहायला मिळेल.हिंदीतले जॅकी श्रॉफ, आदित्य पांचोली या चित्रपटातून प्रथमच मराठीमध्ये एकत्र आले आहेत. त्यांच्यासह स्वरांगी मराठे, चिन्मयी सुर्वे,कमलेश सावंत अशी तगडी स्टारकास्ट या चित्रपटात आहे. उर्मिला मातोंडकरचं ‘याना याना’ हे आयटम साँगही या चित्रपटाचं आकर्षण आहे. नीलेश वाघमारे यांच्या हार्ट टू हार्ट प्रॉडक्शननं निर्मिती केलेला हा चित्रपट अमर गुप्ते यांनी दिग्दर्शित केला आहे तर संतोष मुळेकर यांनी संगीत दिग्दर्शन केलं आहे.
पुरेपूर मनोरंजन करणाऱ्या ‘हृदयनाथ’चा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर नक्की पहा येत्या रविवारी २९ एप्रिलला दुपारी १ आणि सायंकाळी ७ वाजता फक्त स्टार प्रवाहवर!
Leave a Reply