गृहिणी महोत्सवाचे शानदार उद्घाटन

 

कोल्हापूर: कोल्हापूर हे सर्वच क्षेत्रात अग्रेसर आहे सध्या गृहिणी महोत्सवाच्या माध्यमातून युवक युवतींनाही करिअरच्या संधी मिळाव्यात यासाठी आमदार सतेज पाटील आणि प्रतिमा सतेज पाटील यांचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे कोल्हापुरात आयटी क्षेत्र विकसित व्हावे यासाठी प्रयत्न व्हावेत अशी इच्छा अभिनेते शशांक केतकर यांनी व्यक्त केली ते प्रतिमा सतेज पाटील सोशल वेल्फेअर फौंडेशनतर्फे आयोजित करण्यात आलेल्या गृहिणी महोत्सवाच्या उदघाटनाप्रसंगी बोलत होते.
प्रतिमा सतेज पाटील सोशल वेल्फेअर फौंडेशन आणि डी .वाय पाटील ग्रुपच्यावतीने शाहूपुरी जिमखाना इथं आयोजित करण्यात आलेल्या गृहिणी महोत्सवाचे महापौर स्वाती यवलुजे उदघाटन आमदार सतेज पाटील, डी वाय पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ संजय डी. पाटील डी वाय पाटील शिक्षण संस्थेचे विश्वस्त ऋतुराज पाटील, पृथ्वीराज पाटील, तेजस पाटील, प्रकृती कुणाल खेमणार,भारती संजय मोहिते यांच्या प्रमुख उपस्थितीत अभिनेते शशांक केतकर यांच्या हस्ते झाले. यावेळी बोलताना अभिनेते शशांक केतकर यांनी कोल्हापूर आणि माझं नातं खूप जुनं आहे. प्रायव्हेट हायस्कुलमध्ये शिकलो त्यानंतर डी वाय पाटील शिक्षण संस्थेत शिक्षण घेतले. त्यानंतर अभिनय क्षेत्राकडे वळलो. गेल्या चौदा वर्षांपासून आमदार सतेज पाटील आणि प्रतिमा सतेज पाटील यांनी गृहिणी महोत्सवाच्या माध्यमातून महिलांना स्वावलंबी केले आहे. आता या गृहिणी महोत्सवाची व्यापकता वाढली आहे. युवक आणि युवतींच्या करिअरसाठी प्रयत्न केले जात आहेत. आपल्याला ज्या क्षेत्राची आवड आहे. त्या दृष्टीने करिअरच्या संधी मिळतील. या महोत्सवाती आय टी क्षेत्रातील तज्ञांकडून मार्गदर्शन मिळणार आहे. त्यामुळे कोल्हापुरात आयटी क्षेत्राचा विकास झाला पाहिजे. या आयटी क्षेत्राच्या विकासासाठी प्रयत्न व्हावेत अशी इच्छा अभिनेते शशांक केतकर यांनी व्यक्त केली.
यावेळी आमदार सतेज पाटील यांनी महिलांसाठी सर्वप्रथम प्रतिमा पाटील आणि आपण या गृहिणी महोत्सवाला सुरवात केली. या महोत्सवाच्या माध्यमातून गेल्या चौदा वर्षात हजारो महिला स्वावलंबी झाल्या. अनेक महिलांना स्वतःच्या पायावर उभे केले. महिला सक्षमपणे पुढे येतात यामुळे सिंहाचा वाटा आम्हाला घेता आला. आज राज्यभरातील यशस्वी महिला या ठिकाणी आल्या आहेत. ऋतुराज आणि पृथ्वीराज यांच्यामुळे या महोत्सवात युवक आणि युवतीच्या करिअरसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे करिअरचे मार्गदर्शन युवकांना मिळणार आहे. युवकांना स्वतःच्या पायावर उभे राहणे आणि नोकरीच्या संधी मिळाव्यात यासाठी आपले प्रयत्न आहेत. या पुढेही युवकांना प्रशिक्षण देऊन नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील राहू अशी ग्वाही आमदार सतेज पाटील यांनी दिली. तसेच अनेक महिलांचा वाढता प्रतिसाद लक्षात घेऊन पुढच्या वर्षीच्या गृहिणी महोत्सवाची तारीख या महोत्सवातच जाहीर करावी असे त्यांनी सांगितलं.
यावेळी प्रकृती खेमणार यांनी गृहिणी महोत्सवाला शुभेच्छा दिल्या. यानंतर जागतिक महिला दिनानिमित्त घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेतील विजेत्यांना शशांक केतकर, डॉ संजय डी पाटील, प्रतिमा सतेज पाटील यांच्या हस्ते बक्षीस देऊन गौरविण्यात आले. यावेळी जागतिक महिला दिनानिमित्त काढण्यात आलेल्या प्रबोधन रॅलीत प्रथम क्रमांक पटकावला बद्दल गार्डन क्लब, द्वितीय क्रमांक पटकावल्याबद्दल मोहिनी पैठणी ग्रुप, तर तृतीय क्रमांक पटकावल्याबद्दल स्वामींनी महिला संस्था यांना बक्षीस देऊन गौरविण्यात आले. तर जोतिर्लिंग विद्यालय, वारणा भगिनी मंडळ, विवेकानंद कॉलेज ग्रुप यांना उत्तेजनार्थ बक्षीस देऊन गौरविण्यात आले. महिला दिनानिमित्त छायाचित्र स्पर्धा घेण्यात आली होती या स्पर्धेतील विजेते स्पर्धक असिफ राज मकानदार,अजय शशिकांत मोरे, अमोल संधुगडे, शशिकांत मोरे, वैधही चव्हाण यांना तर फेस पेंटिंग स्पर्धेत शिवानी पसारे, तृप्ती कारंडे, सिद्धी वेळूनकर यांना संजय डी पाटील आणि शशांक केतकर आणि प्रतिमा सतेज पाटील यांच्या हस्ते बक्षीस देऊन गौरविण्यात आले. यावेळी महिला आणि बालकल्याण समिती सभापती सुरेख शहा, शिक्षण समिती सभापती वनिता देठे, नगरसेविका दीपा मगदूम, वृषाली कदम, शुभ कवाळे, उमा बनछोडे, सुरमंजिरी लाटकर, सुलोचना नाईकवडे, ट्रेशला गांधी, ममता झंवर, रेणुका सप्रे, सुश्मिता पाटील, रुपाना नागेशकर, बिना जनवाडकर यांच्यासह महिला नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!