स्टार प्रवाहची ‘नकळत सारे घडले’ ठरली सर्वोत्कृष्ट मालिका

 

मराठी चित्रपट, नाटक आणि मालिकांचा गौरव करणारा संस्कृती कलादर्पण गौरव रजनी सोहळा नुकताच थाटात संपन्न झाला. या सोहळ्यात ज्येष्ठ अभिनेते रमेश भाटकर यांना जीवनगौरव पुरस्काराने गौरवण्यात आलं. स्टार प्रवाहची ‘नकळत सारे घडले’ ही मालिका सर्वोत्कृष्ट ठरली. तर विठूमाऊली ठरली लक्षवेधी मालिका. स्टार प्रवाहच्या इतर मालिकांनीही विविध विभागांमध्ये पुरस्कार पटकावले.अर्चना नेवरेकर फाऊंडेशनतर्फे दरवर्षी संस्कृती कलादर्पण पुरस्कार देण्यात येतात. यंदाही चित्रपट, नाटक आणि टीव्ही मालिका क्षेत्रातील सर्वोत्तम कलाकृतींचा सन्मान करण्यात आला. मराठी मनोरंजन क्षेत्रातील मान्यवर कलाकारांनी या सोहळ्याला हजेरी लावली होती. या रंगारंग सोहळ्यात कलाकारांनी  दमदार परफॉर्मन्स सादर केले. सई देवधरची ठसकेबाज लावणी आणि गश्मीर महाजनीच्या रॉकिंग परफॉर्मन्सने उपस्थितांची मन जिंकली. तर, मानसी नाईकच्या घुमरनं उपस्थितांची दाद मिळवली. या सोहळ्यात  स्टार प्रवाहच्या लोकप्रिय मालिकांतील कलाकारांनीही लक्षवेधी नृत्याविष्कार सादर केला. हरीश दुधाडे, नुपूर परुळेकर, अक्षर कोठारी, ऐतशा संझगिरी, रुपल नंद, समीर परांजपे, ज्ञानदा रामतीर्थकर, गौरव घाटणेकर, अजिंक्य राऊत, एकता लब्दे, सायली देवधर आणि विकास पाटील यांच्या परफॉर्मन्सने सोहळ्याची रंगत आणखी वाढली.नकळत सारे घडले या मालिकेनं सर्वोत्कृष्ट मालिकेसह सर्वोत्कृष्ट अभिनेता (हरीश दुधाडे), सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (नुपूर परुळेकर) असे पुरस्कार पटकावले.दमदार परफॉर्मन्सेस असलेला हा रंगारंग सोहळा आपल्याला लवकरच स्टार प्रवाहवर पाहता येणार आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!