डॉ.चंद्रकुमार नलगे यांना आचार्य अत्रे साहित्य पुरस्कार जाहीर

 

कोल्हापूर: आचार्य अत्रे यांच्या जन्मगाव सासवड येथील“आचार्य अत्रे प्रतिष्ठान तर्फ प्रदान करण्यात येणारा आचार्य अत्रे साहित्य पुरस्कर सुप्रसिध्द लेखक,प्रा. डॉ. चंद्रकुमार नलगे यांना या वर्षाचा जाहीर झाला आहे. हा पुरस्कार तेरा जून रोजी सासवड येथे प्रदान करण्यात येणार आहे.गेली अठ्ठावीस वर्षे हा पुरस्कार अनेक नामवंत साहित्यिकांना देण्यात आले आहेत. प्रा. डॉ. चंद्रकुमार नलगे यांना महाराष्ट्रातील अनेक शहरातील फोंडेशनचे,प्रतिष्ठीत असे ६४ पुरस्कार मिळाले आहेत. त्यांची ८६ पुस्तके प्रकाशित झाली असून महाराष्ट्र शासनाचे तरा पुरस्कार मिळाले आहेत. त्यांना शैक्षणिक क्षेत्रेत्रातील महाराष्ट्र शासनाचा आदर्श प्राध्यापक पुरस्कार लाभला आहे. महाराष्ट्रभर गाजलेल्या ‘अंगाई’ चित्रपटाला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला आहेवाड्मय क्षेत्रातील एकाच ललित गद्य प्रकारातील चार पुस्तकांना शासनाच ग्रंथपुरस्कार प्राप्त झाले आहेत. महाराष्ट्र शासनानेच प्रा. नलगे यांचा सात पुस्तके प्रकाशित केली आहेत. सगळया वाय प्रकारात लेखनाची क्षमता प्रा. नलगे यांच्या लेखणात जन्मतःच आहे. त्यांचा पुस्तकं महाराष्ट्र,मध्यप्रदेश, कर्नाटक या राज्यांच्या विद्यापीठांत अभ्यासक्रमासाठी नियुक्त केली गेली आहेत. बालवाङमयाचा, प्रौढवाङ्मयाचा हा पुस्तक यांना लिहिली आहेत. त्यांनी लिहिलेली ‘रातवा’,‘आणखी एक जन्म’ही आत्मचरित्रे मराठीत श्रेष्ठ आत्मचरित्रे मानली जातात. त्यांनी इ. ९ वीत असताना लिहिलेल्या पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार प्राप्त झाला होता. या त्यांच्या कार्याबद्दल पद्मश्री डॉ.डी. वाय. पाटील विद्यापीठाने (मुंबई) त्यांना डी. लिट्. पदवी प्रदान करून त्यांचा गौरव केला आहे. प्रा. नलगेनी शैक्षणिक,सांस्कृतिक, साहित्य क्षेत्रात बहुमोल कामगिरी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!