
कोल्हापूर : कसबा बावडा रोड वरील ड्रीम वर्ल्ड वाटर पार्क येथे २० मे रोजी कोल्हापूरकरांसाठी पूल पार्टी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी ४ ते सायंकाळी १० वाजेपर्यंत हा कार्यक्रम होणार असून याद्वारे करवीरवासियांचा आनंद द्विगुणित होणार आहे. या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये विविध प्रकारचे फूड स्टॉल, वेव पुल,वाटर राईड, दोन स्टेज, इंपोर्टेड बाईक्स फेस्टिवल यांचा समावेश असणार आहे. तसेच कार्यक्रमासाठी ११ वेगवेगळ्या प्रकारचे डीजे हे खास आकर्षण असणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या नियमानुसारच साऊंड सिस्टिम लावली जाणार आहे. या कार्यक्रमासाठी पासेस अगदी नाममात्र शुल्क भरून उपलब्ध असून लवकरात लवकर हे पासेस घेऊन मोठ्या संख्येने कार्यक्रमासाठी आपल्या कुटुंबासह कोल्हापूरवासीयांनी यावे अशी माहिती राज जाधव व पी. नायडू यांनी पत्रकार परिषदेत दिली. अशा प्रकारच्या कार्यक्रमाचे आयोजन कोल्हापूर मध्ये पहिल्यांदाच होत असून मे महिन्याच्या सुट्टीत एक आगळा वेगळा अनुभव व आनंद घेण्यासाठी २० मे रोजी कुटुंबासह या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा असे आवाहन संयोजकांनी केले आहे. पत्रकार परिषदेला निखिल चावला, आशिता बनगे,आसिफ हकीम,श्रीहरी हेगिष्टे, आकाश मुंडेकर उपस्थित होते.
Leave a Reply