
कोल्हापूर: गेली ३७ वर्षे नाट्य व संगीत क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अभिरुची या संस्थेच्या वर्धापनदिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यावर्षी कोल्हापुरात प्रथमच संगीताची सुप्त इच्छा असणाऱ्या हौशी व नवोदित कोल्हापूरमधील गायकांसाठी व्यासपीठ खुले करून देण्यात आले आहे. यासाठी अभिरुची संस्थेच्या माध्यमातून ‘कोल्हापूर सिंगिंग आयडॉल’ या भव्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेची प्राथमिक फेरी २७ मे रोजी सकाळी ९ वाजता शाहू स्मारक भवन येथे होणार असून १५ व १५ वर्षावरील इच्छुकांना यात सहभागी होता येईल अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष प्रसाद जमदग्नी यांनी पत्रकार परिषदेत दिली. या स्पर्धेची अंतिम फेरी ६ जून रोजी सायंकाळी ६ वाजता होणार असून स्पर्धेतील प्रथम, द्वितीय, तृतीय व उत्तेजनार्थ विजेत्यांना अनुक्रमे २० हजार,१५ हजार,१० हजार आणि दोन हजार पाचशे रुपये बक्षीस व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.
याचबरोबर ४ व ५ जून रोजी सायंकाळी ६ वाजता एकांकिका सादरीकरण होणार आहे. यामध्ये नवीन व जुने अश्या कलाकारांचा मेळ घालून या एकांकिकांचे सादरीकरण होणार आहे.
तरी या स्पर्धेत जास्तीत जास्त कलाकारांनी सहभागी व्हावे असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी ९५५२७०९०००,९८२२५४०५२५ व ९९२३२५४५६७ या क्रमांकावर संपर्क साधावा. पत्रकार परिषदेस सचिव जितेंद्र देशपांडे, आनंद रणनवरे,अपर्णा कुलकर्णी, सीमा मकोटे,केतकी जमदग्नी, सिद्धी दिवाण,शांभवी कुलकर्णी, श्रीपाद पाटील, अवधूत पोतदार,ऋतुराज आमटे, त्रिशाली कांबळे,गायत्री जाधव उपस्थित होते.
Leave a Reply