
कोल्हापूर: हिंदवी स्वराज्याची राजधानी असलेल्या दुर्गराज रायगड किल्ल्याची पहाणी करण्यासाठी रायगड विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष संभाजीराजे छत्रपती यांच्या पुढाकाराने केंद्रीय पर्यटन मंत्री के.जे.अल्फोन्स आज येणार आहेत.
रायगड विकास प्राधिकरण मार्फत रायगडावरील चालू असलेल्या विविध कामांचा आढावा घेण्यासाठी किल्ले रायगडला भेट देणार आहेत. रायगड किल्ल्याचा भौतिक विकास होण्यासाठी व पर्यटनवाढीसाठी हा मंत्र्यांचा दौरा महत्वपुर्ण मानला जात आहे. सकाळी ११ वाजता ते गडावर येतील तसेच दुपारी ३ वाजता ते मुंबई कडे प्रस्थान करतील.
Leave a Reply