
रायगड: देशाच्या इतिहासात मराठा साम्राज्याचे योगदान महत्वपूर्ण असून छत्रपती शिवरायांनी स्थापन केलेल्या स्वराज्याचा आदर्श आजच्या राज्यकर्त्यांना आदर्शवत आहे.
शिवरायांनी इतक्या उंच पर्वतावर उभारलेली राजधानी पाहून त्यांनी अश्चर्य व्यक्त केले. जगभरात अनेक किल्ले पाहीले परंतू रायगड किल्ला पाहिल्यावर मी अक्षरशः भारावून गेलो आहे.गडावर चाललेले उत्खननाचे काम पाहून समाधान व्यक्त केले. या उत्खननात मिळालेल्या सर्व वस्तू त्यांनी पाहिल्या. गडाचा लष्करीदृष्ट्या अभ्यास, तसेच गडावर मिळालेल्या सर्व वस्तूचा अभ्यास करणे गरजेचे आहे. महाराजांचा इतिहास व महाराष्ट्रात असलेले गडकिल्ले यांचे चांगल्याप्रकारे सादरीकरण केल्यास, जगभरातला अभ्यासक रायगडाकडे आकर्षित होतील अशी अशा त्यांनी व्यक्त केली.
यावेळी केंद्रीय मंत्री के.जे.अल्फोन्स म्हणाले रायगड किल्ल्याच्या विकासासाठी महाराष्ट्र शासन व केंद्र शासन यांच्या संयुक्त प्रयत्नातून मी कटीबध्द रहाणार आहे. तसेच मी महाराष्ट्रातील शिवछत्रपतींच्या स्वराज्याचे वैभव पाहण्यासाठी आलो असून येथे मी पहिल्यांदाच आलो आहे, खासकरून स्वराज्याची राजधानी रायगड किल्ला पाहण्यासाठीच आलो आहे. रायगड किल्ल्याची दुर्गमता, येथील वास्तू, नगारखाना, प्रवेशकमानी, राजवाडे, बाजारपेठ आणि शिवरायांचे तख्त जेथे होते तो मेघडंबरीचा परिसर पाहून मी थक्क झालो आहे. हे सर्व वैभव पाहून छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात राजधानीचा किल्ला कसा असेल याची कल्पना येते. खासदार संभाजीराजे छत्रपती हे शिवाजी महाराजांचे वंशज आहेत, त्यानी या किल्ल्याच्या संवर्धनाचे काम हाती घेतले आहे ही विशेष समाधानाची बाब आहे. रायगड किल्ल्याबरोबरच किल्ला परिसरातील गड पायथ्याला असलेल्या एकवीस (२१) गावांचा विकास करण्या योजनेला माझे सहकार्य राहिल.
संभाजीराजे छत्रपतींनी सांगितले की रायगड प्राधिकरणचा अध्यक्ष आणि गडकिल्ल्यांचा ब्रॅंड अॅम्बेसेडर म्हणून मी जगाच्या नकाशावर शिवछत्रपतींचा इतिहास तसेच रायगड किल्ल्यांचा लौकीक पोहचवण्यासाठी प्रयत्नशील राहणार असून केंद्रीय पर्यटन मंत्रालयाकडून रायगडसाठी जे जे शक्य आहे ते ते करणार असल्याचे सांगितले
रायगड विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष,खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या पुढाकाराने झालेल्या या भेटीत गडाच्या पायथ्याला असलेल्या गावांचाही विकास करण्याबाबत चर्चा झाली.
यावेळी डॉ.ए.के.सिन्हा – डी.जी.(निवृत्त) भारतीय पुरातत्व खाते , कॅप्टन शिवाजीराव महाडकर, प्रा.श्री. रामनाथन (प्राधिकरण तज्ञ मारगदर्षक), बिपीन नेगी, ए.एस.आय. सुपरिंटेंडंट, मुंबई, पांडूरंग बलकवडे, सुधीर थोरात इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
Leave a Reply