
कोल्हापूर : सुफी,बॉलीवूड, पंजाबी, डिस्को,पॉप,अश्या विविध प्रकारची गाणी गाऊन अगदी कमी कालावधीतच लोकप्रियतेचे शिखर गाठलेली यु ट्यूब ची सेंसेशन, आघाडीची बॉलीवूड पॉप सिंगर व इंडो किवी सिंगर (गायिका) ‘शर्ली सेटीया’ जिच्या गाण्यांना १४ लाखाहून अधिक यु ट्यूब सबस्क्रायबर, ३३ लाख फेसबुक व एक लाखाहून अधिक ट्विटर फॉलोअर्स आहेत.व अजूनही याची संख्या वाढतच आहे. अश्या हिट व आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सिंगरचा लाईव्ह शो कोल्हापुरात प्रथमच होत आहे. आत्ताच्या पिढीला जिच्या मधुर आवाजाने भुरळ पाडली. तसेच सर्वात कमी वयाची व सुंदर गायिका म्हणून जिची जगभर ख्याती आहे अश्या ‘शर्ली सेटीया’ चा एक खास लाईव्ह शो कोल्हापुरात हॉटेल सयाजीच्या साज लॉन येथे येत्या शनिवारी २६ मे रोजी सायंकाळी ७ वाजता होणार आहे. अशी माहिती एम्बीएन्स चे व्यवस्थापकीय संचालक मुकेश सिंग यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. शर्ली चे भारतातील हे आठवे लाईव्ह कॉन्सर्ट असून कोल्हापूर च्या तरुणाईला अश्या लाईव्ह शो साठी पुणे व मुंबईला जाण्याची गरज नाही.तर प्रत्यक्ष कोल्हापूरातच अश्या प्रकारचा शो अनुभवण्याची संधी कोल्हापूरकरांना मिळणार आहे असे संयोजक आशिष नागदेव व श्याम चंदवाणी यांनी सांगितले. या शो चे पासेस हॉटेल सयाजी आणि डीवायपी सिटी मध्ये उपलब्ध आहेत.तरी कोल्हापूरकरांनी ही संधी गमावू नये असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
Leave a Reply