‘इपितर’ चित्रपटाच्या गाण्यांना मिळतोय भरघोस प्रतिसाद

 
इपितर’ सिनेमाविषयी त्याच्या फस्ट लूक पोस्टरपासूनच प्रचंड उत्सूकता होती. चित्रपटाच्या नावात जसे वेगळेपण आहे, तसचं वेगळेपण सिनेमाच्या संगीतामध्ये आहे. सिनेमाचे संगीत युट्यूबवर येताच संगीताला मिळणा-या रसिकांच्या प्रतिसादावरून संगीत जनमानसात लोकप्रिय होत असल्याचे दिसून येत आहे.
 सिनेमाच्या ऑडियो ज्युकबॉक्सला दोन दिवसांत 12 हजार व्ह्युज मिळाले आहेत. त्याचप्रमाणे नुकताच ‘हलव हलव अंगाला’ ह्या सिनेमातल्या गाण्याचा व्हिडीयोसूध्दा रिलीज झाला आहे. ह्या गाण्यालाही एका दिवसात 36 हजारावर व्हयुज मिळाले आहेत. सिनेमाचे निर्माते आणि लेखक किरण बेरड ह्यांनीच ‘हलव हलव अंगाला’ ह्या गाण्याचे गीत लिहीले आहेत तर जयभीम शिंदे ह्यांनी संगीत दिलेलं हे गाणं आदर्श शिंदेने गायलं आहे.
 गायक आदर्श शिंदे ह्या गाण्याविषयी सांगतात, “ग्रामीण बाजाचे हे गाणं आहे. गावातल्या वरातीची अनुभूती देणारं हे गाणं अस्सल गावरान मातीतलं असल्यानं ते गायला मला फार आवडलं. वरातीतलं गाणं मी पहिल्यांदाच गायलं आहे. आणि मला पूर्ण विश्वास आहे की, गावाकडच्या यंदाच्या सगळ्या वरातीत हे गाणं वाजेल.”
 गाण्याच्या पाठोपाठ चित्रपटाचा टिझर ही नुकताच रिलीज झाला आहे.या चित्रपटाचे दिग्दर्शक दत्ता तारडे हे आहेत तर डॉ. सोनाली पाटील रॉय आणि डॉ. संदिप सत्यदेव रॉय प्रस्तुत, किरण बेरड, नितिन कल्हापूरे आणि सुधीर बोरुडे निर्मित  इपितर 8 जून 2018 ला रिलीज होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!