कोल्हापूरच्या ओंकार गुरवची इंडियन मिलिट्री अकॅडमीत निवड 

 
कोल्हापूर: केंद्रीय  लोकसेवा आयोगातर्फे लष्करी सेवेकरिता घेण्यात आलेल्या   (कम्बाईड डिफेन्स सर्विस ) परिक्षेत ओंकार अनंत गुरव याची डेहराडून येथील इंडियन मिलिटरी अकॅडमी (आयएमए) मध्ये निवड झाली आहे.
    केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे (युपीएससी )कठीण समजली जाणारी हि देश पातळीवरील परिक्षा सन २०१७ मध्ये  ही  घेण्यात आली होती. त्यात ओंकार गुरव ९७ व्या स्थानी आला.एस.एस.बी.मुलाखतीनंतर डेहराडुन येथील आयएमए मध्ये त्य्याची निवड झाली आहे.तेथील दिड वर्षांच्या खडतर लष्करी प्रशिक्षणा नंतर ओंकार गुरव हिंदुस्थानी लष्करामध्ये ‘लेफ्टनंट’ पदावर रुजू होणार आहे. ओंकारचे प्राथमिक शिक्षण पिंपरीतील जयहिंद विद्यालय आणि एसएनबीपी स्कूलमधे झाले आहे. सद्या तो कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठात संगणक अभियांत्रिकीच्या अंतिम वर्षात शिकत आहे. ओंकारची आई माधवी गुरव या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या पुण्यातील शाखेमध्ये व्यवस्थापिका पदावर कार्यरत आहेत. तर, वडील डॉ.अनंत गुरव ज्येष्ठ पत्रकार आहेत.त्यांचे मुळ गांव हसुरसगिरी,ता. गडहिंग्लज आहे.आपल्या यशामध्ये आई – वडील, गुरूजन आणि मित्रांचे महत्वपूर्ण योगदान लाभल्याचे ओंकार गुरव याने सांगितले. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!