
कोल्हापूर : कोल्हापूर येथील शुक्रवार पेठ मधिल ऋतुरंग डान्स ॲकॅडमीच्यावतीने रविवारी २७ मे रोजी संध्याकाळी ५ वाजता रंकाळा पदपथ उद्यान येथे ऋतुरंग कलाविष्कार कार्यक्रम सादर केला जाणार आहे. त्याअंतर्गत शास्त्रीय वाद्यवृदांच्या तालावर छत्रपती शिवाजी महाराजांवर आधारीत पोवाडा सादर केला जाणार आहे. मुख्य म्हणजे हा पोवाडा अवघे ४ वर्षे वय असणारी पुर्वा भालेकर ही चिमुकली सादर करणार आहे. अशी माहिती ॲकॅडमीची प्रमुख ऋतुजा पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली.तसेच या पोवाडा सादरीकरणाबरोबरच विविध कला प्रकारही सादर होणार आहोत. त्यामध्ये फोक स्टाईल लावणी, बॉलीवूड सॉँग, क्लासीकल ॲक्ट, मलायला हिच्या भाषणावरील नृत्य प्रकार पाहण्याची संधी रसिकांना मिळणार आहे. त्याचबरोबर ती फुलराणी हे अनोखे स्किटही सादर केले जाणार आहे. तरुण मुलांच्या कलागुणांना वाव मिळावा या उद्देशाने ॲकॅडमी काम करत आहे. युवा कलाकारांमध्ये स्टेज डेअरींग वाढावे यासाठी हा कलाप्रकार रविवारी घेतला आहे. हा कार्यक्रम पुर्णपणे मोफत असुन यात ६० कलाकार सहभागी होणार आहेत. यावेळी जास्तीजास्त कलाप्रेमींनी यावेळी उपस्थित रहावे. पत्रकार परिषदेला प्रविण भालेकर, साक्षी फराकटे, सारंग माने उपस्थित होते.
Leave a Reply