
कोल्हापूर : हैदराबाद येथे २६ व २७ मे रोजी १२ तास नाईट स्टेडियम रन स्पर्धा पार पडली रात्रीचा बारा तासांचा काळ या स्पर्धेसाठी होता सायंकाळचे ७ ते सकाळचे ७, त्यामध्ये पळालेल एकूण अंतर जवळजवळ पंचाहत्तर किलोमीटर होते एकूण बेचाळीस स्पर्धकांचा यामध्ये समावेश होता कोल्हापुरातजन मात्र विशाल गुडुळकर हा एकमेव स्पर्धक या रणमध्ये सहभागी झाला होता
हैदराबाद मध्ये ही धावण्याची राष्ट्रीय दर्जाची स्पर्धा दरवर्षी आयोजित केली जाते ही स्पर्धा कठीण असते त्यामध्ये संपूर्ण देशांमधून फक्त काही निवडक लोकांना सहभागी होण्याची संधी मिळते.
सलग बारा तास पळायचं, जास्तीत जास्त अंतर गाठायचं, देशातल्या सर्वोत्तम धावपटूं सोबत धावायचं, फक्त दोन तास विश्रांती घेण्याची मुभा असते पण त्यानंतर मात्र किमान दहा तास फक्त आणि फक्त धावायचं.
ही अशी कल्पनेतली वाटणारी स्पर्धा दरवर्षी असते.
यावर्षी आपला कोल्हापूरचा विशाल विलास गुडुळकर यामध्ये सहभागी झाला होता, विशालने आजपर्यंत अनेक मॅरेथॉन मध्ये सहभाग घेतलेला आहे, तो आपल्या देशातील काही निवडक धावपटूंपैकी आहे ज्याने अगदी लहान वयातच स्वतः मॅरेथॉन आयोजित केल्याच्या पराक्रम गाजवला आहे, भारतात होणाऱ्या जवळपास सगळ्या मॅरेथॉन मध्ये विशालने सहभाग घेतलेला आहे आणि त्या गाजवलेल्या देखील आहेत.
यावर्षी फेब्रुवारी मध्ये झालेल्या “गरवाल रन २०१८” मध्येही त्याने ७४ किलोमीटरच अंतर ११ तासांच्या आत मध्ये कापले होते. आणि यावर्षी लडाक येथे होणा-या ‘ला अल्ट्रा – द हाय’ ही १११ की.मी अंतर असलेली आंतरराष्ट्रीय दर्जाची स्पर्धेस तो पात्र ठरलेला आहे.
विशाल यावर्षी २६ मे व २७ मे रोजी है द्राबाद झालेल्या या राष्ट्रीय दर्जाच्या नाईट स्टेडियम रन मध्ये सहभागी होऊन त्याने अवघ्या बारा तासांमध्ये पंचाहत्तर किलोमीटर एवढं अंतर कापले, यात त्याने १८७ लॅपस पूर्ण केल्या, त्याच्याकडे दोन तास विश्रांती ची संधी असूनदेखील त्याने सलग बारा तास धावला आणि यावर्षीचे अजून एक विशेष म्हणजे ही स्पर्धा रात्री घेण्यात आलेली होती, आणि आपला विशाल स्टेडियम मध्ये होणाऱ्या या १२ तास नाईट रन मध्ये सहभागी होणारा पहिला कोल्हापूरकर ठरला आहे.
Leave a Reply