
मराठी चित्रपटांचे अलीकडे केवळ आशयविषयच नाही, तर चित्रपटांची नावंही वेगळी असतात. परफ्युम हा चित्रपट त्यापैकीच आहे. उत्तम कलाकारांचा समावेश असलेला हा “परफ्युम” सप्टेंबरमध्ये दरवळणार आहे. ओंकार दीक्षित आणि मोनालिसा बागल ही नवी जोडी या चित्रपटातून रुपेरी पडद्यावर झळकणार आहे .
एचआर फिल्मडॉमच्या डॉ. हेमंत दीक्षित आणि ओंकार दीक्षित यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे तर “हलाल”सारख्या गाजलेल्या चित्रपटाची निर्मिती केलेल्या तसेच आगामी “लेथ जोशी” चित्रपटाची प्रस्तुती करणाऱ्या अमोल कागणे स्टुडिओजचे अमोल कागणे आणि लक्ष्मण कागणे यांनीच “परफ्युम”ची प्रस्तुती केली आहे. दिग्दर्शक
आणि कॅमेरामन म्हणून करण तांदळे यांनी काम पाहिले आहे. ओंकार आणि मोनालिसासह अभिनेता चिन्मय मांडलेकर, अभिजित चव्हाण, सयाजी शिंदे, अनिल नगरकर, कमलेश सावंत, भाग्यश्री न्हालवे असे उत्तम आणि अनुभवी कलाकारही या चित्रपटात आहेत.

महिन्यात हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे
Leave a Reply