सरकारच्या सामान्य विरोधी धोरणांचा देशाच्या अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम : माजी अर्थमंत्री पी.चिदंबरम

 

कोल्हापूर: सरकारच्या सामान्य विरोधी धोरणांचा आज देशाच्या अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम होत आहे. सर्वच आघाड्यांवर सरकार अपयशी ठरले आहे अशी टीका आज कोल्हापुरात माजी केंद्रीय अर्थमंत्री,अर्थतज्ञ खा. पी.चिदंबरम यांनी केली. “राष्ट्रीय अर्थव्यवस्था – सध्यस्थिती व परिणाम” या विषयावर मार्गदर्शन सत्र कोल्हापूर चेंबर ऑफ काॅमर्स अँड इंडस्ट्रीजच्या वतीने आयोजित करण्यात आले होते यानिमित्त त्यांनी सरकारवर टिकेची झोड उठवली.
यावेळी खा.पी.चिदंबरम यांनी जीएसटी, नोटाबंदी, इंधन दरवाढ, रोजगार निर्मिती, शेती व बँकिंग क्षेत्राची चुकीची हाताळणी व रोजगार निर्मिती मध्ये अपयशी ठरलेल्या सरकारच्या सामान्य विरोधी धोरणांचा आज देशाच्या अर्थव्यवस्थेवर विपरीत परीणाम झाल्याचे चित्र दिसत असल्याचे मत व्यक्त केले. परीणामी व्यापारी, उद्योजक, नोकरदार वर्ग, शेतकरी व सर्व सामन्य नागरीक या सर्वांना आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागत असल्याची वास्तव परिस्थिती देखील त्यांनी निदर्शनास आणून दिली.
“अच्छे दिन” च्या खोट्या आश्वासनाला भरीस जाऊन, भाजप व एनडीए सरकारला दिलेल्या बहुमताचा आणि अंत्यत अनुकूल जागतिक व अंतरिक आर्थिक स्थितीचा योग्य तो फायदा सर्व सामान्यांना मिळालेला नाही. तर, या उलट युपीए सरकारने आपल्या दहा वर्षांच्या कारकिर्दीत देशाच्या अर्थव्यवस्थेला विपरीत आर्थिक परिस्थितीमध्ये सातत्याने प्रगतीपथावर चालवत सर्व सामान्यांना योग्य तो लाभ मिळवून दिला असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. या मार्गदर्शन सत्रास महापौर सौ. शोभा बोंद्रे, उप-महापौर महेश सावंत,आ. सतेज पाटील, केसीसीआय चे अध्यक्ष ललित गांधी, उपाध्यक्ष संजय शेट्टी, चंद्रकांत जाधव, प्रदीप कापडिया, माजी आ. शरद रणपिसे, कॉंग्रेस पक्ष शहराध्यक्ष प्रल्हाद चव्हाण यांच्यासह मान्यवर उपास्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!