
शिवाजी पुलाला पर्यायी पूल बांधण्याचा मार्ग मोकळा झाल्यामुळे, कोल्हापूरवासीयांची मागणी पूर्ण झाली आहे. त्याबद्दल समाधान वाटत असल्याचे खासदार धनंजय महाडिक यांनी नमूद केले. पुलाच्या रखडलेल्या बांधकामाबद्दल संसदेत आवाज उठवून, वेळोवेळी पाठपुरावा केला होता. शिवाय कोल्हापूरच्या जनतेने व्यापक आंदोलन उभारुन जनमताचा रेटा निर्माण केला होता. तसेच पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि राज्य सरकारही पर्यायी पूल बांधण्याबद्दल सकारात्मक प्रयत्नशील होते. या सगळ्याचा परिणाम म्हणून, पर्यायी पूल बांधकामाचा प्रश्न निकाली निघाला आहे. हा कोल्हापूरच्या जनतेचा विजय असून, सर्व लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी यांच्यातील समन्वयाचा परिणाम आहे. आता लवकरच पुलाचे बांधकाम पूर्ण होईल आणि ते दर्जेदार असेल, याबद्दलही आपण पाठपुरावा करणार असल्याचे खासदार धनंजय महाडिक यांनी म्हंटले आहे.
Leave a Reply