
कोल्हापूर : कोल्हापूरचे धडाडीचे खासदार धनंजय महाडिक यांना सलग दुसऱ्या वर्षी संसदरत्न पुरस्कार
मिळाला आहे. खासदारपदाची सुत्रे स्विकारल्यानंतर खा. महाडिक यांनी कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रातील अनेक प्रश्न संसदेत मांडले. तसेच अनेक प्रश्न सोडविण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला. त्यांच्या या प्रयत्नाला यशही लाभले. त्यामुळे त्यांच्या कामाची दखल घेवून मानाचा संसदरत्न पुरस्कार त्यांना सलग दुसऱ्यावर्षीही जाहीर झाला आहे.

धनंजय महाडिक यांनी खासदारपदावर विराजमान झाल्यानंतर जिल्ह्यातील अनेक प्रश्न संसदेत मांडले. राज्याच्या सर्वांगिण विकासासाठी नियोजनबध्द प्रयत्न सुरू ठेवले आहेत. संसदेतील कामकाजात सहभाग, सर्वसामान्यांच्या प्रश्नाची मांडणी, प्रश्न सोडविण्यासाठी केलेला पाठपुरावा आणि नाविण्यपूर्ण प्रकल्प राबविण्याची तयारीयामुळे खासदार महाडिक यांनी दिल्लीमध्ये स्वत:ची ओळख निर्माण केली. त्यामुळे त्यांना सलग दुसऱ्यावर्षी पुन्हा संसदरत्न पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. कोल्हापूरच्या शिरपेचात हा मानाचा तुरा खोवला असल्याचे मत काही कार्यकर्त्यांनी व्यक्त केले.
Leave a Reply