
स्टार प्रवाहने आजवर आपल्या मालिकांतून वेगवेगळी कथानकं सादर केली आहेत. उत्तम कलाकार, दर्जेदार निर्मितीमूल्यं आणि नवा आशय मांडणारी गोष्ट हे स्टार प्रवाहच्या मालिकांचं वैशिष्ट्य आहे. असाच एक वेगळा विषय घेऊन स्टार प्रवाह प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज आहे. ‘छत्रीवाली’… नाव जितकं हटके आहे तितकीच हटके आहेत यातली पात्रसुद्धा…ही गोष्ट आहे आत्मविश्वासू, कष्टाळू आणि साधेपणात सौंदर्य शोधणाऱ्या मधुराची. तर तिकडे जबाबदारीचं भान नसलेला, लाडात वाढलेला मधुराच्या अगदी विरुद्ध स्वभावाचा आणि तिच्या साधेपणाची सतत टिंगल उडवणारा विक्रम. योगायोगाने विक्रमच्याच ऑफिसमध्ये मधुराणीला जॉबची ऑफर मिळते. आपल्या तालावर मधुराणीला नाचवू पाहणा-या विक्रमला मधुराणी शरण जाते की त्यालाच सरळ करते? नात्याच्या छत्रीखाली या दोघांचं नातं बहरतं का अश्या अनेक प्रश्नांची उत्तर शोधायची असतील तर छत्रीवाली ही मालिका पाहायलाच हवी.मालिकेत संकेत पाठक आणि नम्रता प्रधान ही नवी जोडी पहायला मिळणार आहे. संकेत पाठकनं या पूर्वी स्टार प्रवाहच्याच दुहेरी या लोकप्रिय मालिकेत दुष्यंत ही व्यक्तिरेखा साकारली होती. तर नम्रताची ही पहिलीच मालिका आहे. या मालिकेच्या प्रोमोजनी सोशल मीडियामध्ये उत्सुकता निर्माण केली आहे. तेव्हा ही नवी गोष्ट पाहण्यासाठी सज्ज व्हा.. त्यासाठी १८ जूनपासून न चुकता पहा छत्रीवाली, सोमवार ते शनिवार रात्री ८ वाजता फक्त स्टार प्रवाहवर.
Leave a Reply