

पत्रकारांशी बोलताना अभिनेता सचिन पिळगावंकर यांनी चित्रपटांविषयी अधिक माहिती देताना म्हटले कि हया सिनेमात मी असा रोल साकार केला आहे कि जो मी आतापर्यंत साकारला नव्हता, म्हणूनच मला ह्या चित्रपटांत काम करताना जास्तच मजा आली. माझ्या अपोजिट शिल्पा तुळस्कर ने बायकोची भूमिका साकारली आहे व शिल्पा बरोबर ब-याच वर्षांनी एकत्र काम करताना फारच मजा आली. एवढचं काय तर ह्या चित्रपटांत माझे वडिल विक्रम गोखले आहेत व त्यांच्याबरोबर देखील काम करताना फारच मजा आली. दर्शकांना ह्या सिनेमातून नक्कीच काहीतरी पहावयास मिळणार आहे, ह्याबद्दल तर काही शंकाच नको. कारण लेखक-दिग्दर्शक गजेंद्र अहिरे ने एका आगळ्या-वेगळ्या विषयांवर सिनेमा बनविला आहे व तो दर्शकांना नक्कीच आवडेल.
अभिनेता विक्रम गोखले म्हटले कि गजेंद्र नेहमीच हटके स्टाइलचा सिनेमा बनवितो व तो लेखक-दिग्दर्शक म्हणूनच फारच हुशार व गुणी आहे. चित्रपट ‘सोहळा’ मधून दर्शकांना नक्कीच एक वेगळा विषय पहावयास मिळणार आहे.
के सी बोकाडिया यांनी सांगितले कि मी आतापर्यंत हिंदी भाषेत 38 चित्रपट डायरेक्ट केले आहेत व इतर ही भाषेत चित्रपट बनविले आहे, परंतु माझा हा मराठी भाषेतील पहिला चित्रपट आहे, जो हिंदी चित्रपटासारखाच दर्जेदार बनविला गेला आहे. कंटेन्टवाइज हा चित्रपट फारच अनमोल आहे, जो दर्शंकाना नक्कीच आवडेल. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर मी ह्यापुढे प्रत्येक वर्षी एक मराठी चित्रपट बनविणार आहे.
चित्रपटांविषयी दिग्दर्शक गजेंद्र अहिरे यांनी सांगितले कि हा चित्रपट दर्शकांसाठी नक्कीच एक सेलेब्रेशन म्हणजेच सोहळा असेल. चित्रपट लवकरच थिएटर मध्ये रिलीज करण्यात येणार आहे.
Leave a Reply