चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडे प्रभारी मुख्यमंत्री पद 16 जून पर्यंत

 

कोल्हापूर : एरवी पुणे पदवीधर मतदार संघाचे आमदार आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या ओळखी व्यतिरिक्त कोणतीही ओळख नसेलेले चंद्रकांतदादा पाटील आता राज्याचे मुख्यमंत्री पदाचे दावेदार म्हणून ओळखू लागले आहेत. मंत्रीपदाचा वापर जनतेच्या कल्याणासाठी करणार असल्याचे सांगत पश्चिम महाराष्ट्र्रासह संपूर्ण महाराष्ट्रात भाजपच्या आमदारांची संख्या कशी वाढणार याकडे अधिक लक्ष देत आहेत. वाढदिवसानिमित्त त्यांच्या कार्याचा घेतलेला आढावा…
राज्यात भाजपची सत्ता येण्यापूर्वी कोल्हापूरचे पुणे पदवीधर मतदार संघातील आमदार म्हणून ओळख असलेले दादा कोल्हापूरसर राज्याचे आज दादा बनले आहे. कोल्हापुरातील काॅंग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना या पक्षाच्या नेत्यांनी  कधीही दादांना विचारात कधी घेतले नव्हते. मात्र आज कोल्हापूरसर राज्यातील नेत्यांनी त्यांची धास्ती घेतली आहे. मंत्री झाल्यापासून पश्चिम महाराष्ट्रातील प्रत्येक निवडणूकीत त्यांनी लक्ष घालत भाजपच्या सदस्यांची संख्या वाढवली आहे.
जिल्हयातील प्रमुख जिल्हा परिषदेसह नगरपालिकाही त्यांनी ताब्यात घेतल्या आहे. भाजपच्या आमदारांची संख्या वाढविण्यासाठी त्यांनी काही विद्यमान आमदारांनाही भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या बोली केली आहेत. काॅंग्रेस राष्ट्रवादीची बलस्थाने असलेल्या जिल्हयातील दोन नंबरच्या फळीतील नेत्यांनाच त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करत आगामी विधानसभा निवडणूकीची पुर्वतयारी केली आहे.
कोल्हापूर उत्तर मतदार संघातही भाजपचा आमदार निवडूण आणण्यासाठी एका यशस्वी डावाची सुरुवात केली आहे. भाजपच्या राज्य, देशपातळीवील कार्यामध्येही त्यांचा पुढाकार असतोच यामुळे संघटन कौशल्य म्हणून भविष्यात त्यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाची धूरा दिली जाउ शकते, अशी चर्चाही भाजपच्या गोटात सुरु असल्याचे समजते.
रदृदी गोळा करण्यापासून ते महिलांच्यासाठी स्वच्छतागृह उभारण्याचा संकल्प कौतूकास्पद असल्याचे कार्यकत्र्यांच्याकडून बोलले जाते. त्यांच्या राजकीय कारकिर्दीस शुभेच्छा.

राज्याचे मुख्यमंत्री परदेश दौऱ्यावर गेल्याने प्रभारी मुख्यमंत्रीपदाचा पदभार चंद्रकांत पाटील यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. मुख्यमंत्रीपदासोबतच कृषीमंत्रीपदही चंद्रकांत पाटील यांच्याकडे सोपवण्यात आले आहे. 16 जून पर्यंत चंद्रकांत पाटील यांच्याकडे राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची सुत्रे असतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!