

विजय उषा बॅनरखाली निर्माते विजयकुमार सपकाळ यांनी या चित्रपटाची निर्मिती केली असून या सांगीतिक रोमँटिक लव्ह स्टोरीचं दिग्दर्शन केलंय शाहिद खान यांनी व्ह्यूफाईंडर प्रॉडक्शनच्या अंतर्गत. बॉलिवूडमध्ये लेखक म्हणून नावाजलेले शाहिद खान यांनीच या चित्रपटाची कथा, पटकथा व संवाद लिहिले असून त्यांचं ‘झिंग प्रेमाची’ चित्रपटातून मराठी दिग्दर्शकीय पदार्पण होत आहे. या चित्रपटात संगीताचे बरेच महत्व असून महेश-राकेश यांनी संगीत दिग्दर्शन केलं आहे व गीतं विजय गमरे आणि शाहिद खान यांच्या लेखणीतून उतरली आहेत. चित्रपटात एकूण पाच गाणी असून त्यातील एक सुफ़ी सॉंग येणाऱ्या रमजान ईद मुळे अजूनच खास झालंय.
या चित्रपटाची अजून एक खासियत म्हणजे पहिल्यांदाच मराठी चित्रपटातील गाणी ताज महाल आणि लाल किल्ला सारख्या ऐतिहासिक ठिकाणी चित्रित करण्यात आली आहे. जगातील सात आश्चर्यांपैकी एक असलेल्या ताज महाल ला निखळ प्रेमाचं प्रतीक मानलं जातं आणि याच ठिकाणी या चित्रपटातील प्रेमींवर गाणं चित्रित झाल्यामुळे ‘झिंग प्रेमाची’ सिनेमामध्ये रोमान्स ची उच्च अनुभूती अनुभवायला मिळणार आहे.29 जून 2018 ला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.
एका गावात राहणारे दीपक आणि ज्योती यांचं एकमेकांवर अतोनात प्रेम असतं परंतु गाव, समाज आणि त्यांच्या घरच्यांचा प्रखर विरोध असतो. रविकांत हा गावगुंड त्यांच्याबाबतीत अनेक अफवा उडवतो त्यामुळे दोघांच्या घरातल्यांचा रोष अजूनच वाढतो. ज्योतीचा भाऊ विशाल समंजस असतो आणि ज्योती आणि दिपकचे एकमेकांवरील प्रेम पाहून त्यांना पळून जाऊन लग्न करण्याचा सल्ला देतो. त्याच्या मदतीने ते गावातून पसार होतात का ? व शहरात जाऊन आपला संसार थाटतात ? पुढे काय ? हे आणि अश्या अनेक प्रश्नांच्या उत्तरांसाठी “झिंग प्रेमाची” नक्की पहा.
या चित्रपटातून संदेश गौर आणि शीतल तिवारी हे नवीन चेहरे मराठी चित्रपटसृष्टीला मिळणार आहेत. त्यांनी हिंदी मनोरंजनसृष्टीत बरंच नाव कमावलेलं असून त्यांना मराठी प्रेक्षकांच्या हृदयात स्थान मिळवायचंय. त्यांच्यासोबत अमोल चौधरी, रतन सोमवरे व अनिल मोरे हेदेखील मराठीत पदार्पण करीत असून त्यांना रंजीत जोग, स्मिता पवार, मोहक कंसारा, मृणालिनी जांभळे, जयराम शाहू, विपुल देशपांडे, पोपटराव चव्हाण, दिपज्योती नाईक, स्मृती पाटकर आणि गणेश यादव यांची मोलाची साथ लाभलीय.
‘झिंग प्रेमाची’ चे डीओपी आहेत जय नंदन कुमार. कोरिओग्राफी केली आहे राजेश राणे व प्रितपाल गिल (माँटी) यांनी तर साऊंड डिझाइनर आहेत शैलेश सपकाळ. संकलनाची जबाबदारी सांभाळलीय उमाशंकर मिश्रा (विकी) यांनी आणि रियाझ बलूच एक्सएक्युटीव्ह प्रोड्युसर आहेत.
Leave a Reply