
कोल्हापूर : आंतरराष्ट्रीय गुणांकन असणारी पहिली भगवान महावीर खुली स्पर्धेची सुरुवात येत्या १९ जून रोजी होणार असून या स्पर्धा १९ ते २३ जून या कालावधीत पार पडणार आहेत. या स्पर्धा नागाळा पार्क येथील जयलक्ष्मी सांस्कृतिक भवन येथे होणार आहेत. या स्पर्धा कोल्हापूर चेस अॅकॅडमीच्या वतीने घेण्यात येणार असून यासाठी कै. दिग्विजय खानविलकर फौंडेशन यांचे विशेष सहकार्य लाभले असल्याचे अजितसिह व भरत चौगुले यांनी सांगितले.
या स्पर्धांना भारतीय बुद्धिबळ संघटनेचे मान्यता असून स्पर्धा १९ जून रोजी सकाळी ९ वाजता सुरुवात होणार आहे. दररोज दोन फेऱ्या होणार असून एकूण नऊ फेऱ्या होणार आहेत. यामध्ये गोवा, कर्नाटक, तामिळनाडू राज्यातील स्पर्धकही सभागी झाले आहेत. स्पर्धेमध्ये एकूण एक लाख पंचवीस हजार रुपयांची बक्षिसे असून रोख रक्कम व स्मृती चिन्ह असे स्वरूप आहे. विजेत्यास एकवीस हजार व भगवान महावीर चषक दिले जाणर आहे. स्पर्धेमध्ये गुण मिळालेल्या स्पर्धकांना ५०० तर गुण न मिळालेल्या स्पर्धकांना ६०० रुपये शुल्क असून नाव नोंदणी शिवाजी स्टेडीयम येथे ६ ते ८ या वेळेत करावी अशी माहिती यावेळी देण्यात आली. पत्रकार परिषदेला उत्कर्ष लोमटे, मनिष मारुलकर आदी उपस्थित होते.
Leave a Reply