बिर्ला सन लाईफ म्युच्युअल फंडची शाखा महाराष्ट्रातील साताऱ्यात

 

सातारा : आदित्य बिर्ला सन लाईफ एएमसी लिमिटेड (पूर्वीची बिर्ला सन लाईफ असेट मॅनेजमेंट कंपनी लि.) ही आदित्य बिर्ला कॅपिटल लिमिटेड (अगोदरची आदित्य बिर्ला फायनान्शियल सर्विसेस लिमिटेड) आणि आदित्य बिर्ला सन लाईफ म्युच्युअल फंड (“एबीएसएलएमएफ”) चा इन्व्हेस्टमेंट मॅनेजर  या भारतातल्या 3 ऱ्या सर्वाधिक मोठ्या म्युच्युअल फंडाने आज महाराष्ट्रातील साताऱ्यात त्यांच्या पूर्ण-सेवा शाखेचे उद्घाटन करत असल्याची घोषणा केली. ही नवीन शाखा सातारा येथे म्युच्युअल फंड कानाकोपऱ्यात घेऊन जाण्यात मोलाची भूमिका बजावेल. प्रदेशातील गुंतवणुकदारांच्या वाढत्या वित्तीय गरजा लक्षात घेऊन त्यांना साह्य करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्रातील विकासात हा एबीएसएलएमएफ’चा कार्यशील योगदानकर्ता असेल.
या लॉन्चप्रसंगी बोलताना आदित्य बिर्ला सन लाईफ एएमसी लिमिटेडचे सीईओ ए. बालसुब्रमण्यम म्हणाले की, “आम्हाला महाराष्ट्रात विस्तार करण्याचा आनंद वाटतो, हा म्युच्युअल फंड क्षेत्रातला महत्त्वाचा योगदानकर्ता ठरेल. सातारा आणि कराड, फलटण, वाई, पाटण, लोणंद, महाबळेश्वर आणि पाचगणीसारख्या सभोवतालच्या भागांतून रिटेल इंटरेस्ट स्थिरतेने वाढलेला आहे. बाजारातील क्षमता शोधून काढण्यासाठी आमचे साताऱ्यातील अस्तित्व आम्हाला नक्कीच मदत करेल आणि या विकास धोरणासोबत महाराष्ट्रात आमचे अस्तित्व वृद्धिंगत होईल.”ही शाखा प्रदेशातील रिटेल आणि संस्थात्मक गुंतवणूकदार तसेच वितरण भागीदारांच्या गरजांनुरूप सेवा देईल. ते एबीएसएलएमएफ उत्पादने आणि सेवा सर्व नवीन सक्षम ग्राहकांना पुरवतील.गुंतवणूकदार आणि वितरक यांच्यासाठी भारतातील आदित्य बिर्ला सन लाईफ म्युच्युअल फंडाचे सर्व प्रकारचे म्युच्युअल फंड सोल्युशन्स, व्यवहार आणि सेवा साह्य उपक्रम उपलब्ध असतील. आधार इकेव्हायसी सुविधा असेल तसेच वापरकर्ता-स्नेही मोबाईल अॅप्लिकेशन एबीएसएलएमएफ फिनगोमुळे पहिल्यांदा गुंतवणूक करणाऱ्याला म्युच्युअल फंडांचा सुलभ आणि सोपा अनुभव मिळेल. वितरक ही टूल्स एबीएसएलएमएफकडून वापरू शकतील

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!