
कोल्हापूर: इंडिया फायर सेफ्टी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष युवराज पाटील यांचे वाढदिनी निमित्त युवा इंडिया फाऊंडेशनच्या वार्ता फलकाचे उद्घाटन उद्या ६ जुलै रोजी सकाळी ११ वाजता महापौर शोभाताई बोंद्रे यांच्या हस्ते व माजी महापौर सौ.सई खराडे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो त्याचे उत्तराई व्हावी तसेच समाजातील उपेक्षित व निराधार मुलांना शिक्षण मिळावे त्यांना चांगली आरोग्य सेवा मिळावी आपल्यासाठी देशाच्या संरक्षणासाठी जे जवान शहीद झाले त्यांच्या मुला-मुलींना योग्य शिक्षण व मार्गदर्शन मिळावे या उदात्त हेतूने युवा इंडिया फाउंडेशनची स्थापना करीत आहोत. असे प्राचार्य किरण पाटील यांनी सांगितले. भविष्यात गरीब गरजू निराधार लोकांना योग्य औषध उपचार मिळावेत यासाठी लवकरच मोफत दवाखाना सुरू करण्यात येणार असल्याचे युवराज पाटील यांनी सांगितले. वाढदिवसानिमित्त फाऊंडेशनच्या कार्याची सुरुवात म्हणून शिवाजी मराठा हायस्कूल च्या सर्व विद्यार्थ्यांना गणवेश,दप्तर आणि शूज वाटप करण्यात येणार आहे. तसेच कॉलेज आवारात वृक्षारोपण करण्यात येणार आहे.लवकरच याची व्याप्ती वाढवून समाजातील सर्व वंचित घटकांपर्यंत पोहचणार असल्याचे प्राचार्य किरण पाटील युवराज पाटील व पंकज पाटील यांनी सांगितले.
Leave a Reply