
स्टार प्रवाहच्या मालिका म्हणजे एक कुटुंब असतं. कोणत्याही कुटुंबात जितक्या गंमतीजमती होतात, तशाच त्या मालिकांच्या सेटवरही होतात. नुकतीच लेक माझी लाडकी या मालिकेच्या सेटवर वडापावची मेजवानी झाली. मस्त रिमझिम पाऊस आणि गरमागरम वडापाव असा बेत जमून आला.अभिनेता अविनाश नारकर यांनी पुढाकार घेऊन ही वडापाव पार्टी जमवून आणली. ऐश्वर्या नारकर यांनी वडे करण्यासाठी मार्गदर्शन केलं. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अविनाश नारकर यांच्यासह आशुतोष कुलकर्णी, सायली देवधर, विकास पाटील यांनीही हातभार लावला. त्यामुळे मालिकेच्या सेटवरच्या सगळ्यांनाच गरमागरम वडापावचा आस्वाद घेता आला. या पूर्वी ऐश्वर्या नारकर यांनी सेटवरच नारळाच्या वड्याही केल्या होत्या.छान पाऊस पडत असताना वडापाव खाण्याची इच्छा झाली. विकत आणण्यापेक्षा आपणच सेटवर करू म्हणून वडे करण्याचा घाट घातला. बाकी सगळ्यांनीही ही कल्पना उचलून धरली आणि उत्साहाने मदतही केली. या वडापाव पार्टीमुळे सेटवर सगळेच खूश झाले,’ असं अविनाश नारकर यांनी सांगितलं. सेटवर गंमतीगमती होत असतानाच मालिकेच्या कथानकातही नवनवी वळणं येत आहेत. त्यासाठी न चुकता पहा लेक माझी लाडकी सोमवार ते शुक्रवार रात्री ८.३० वाजता फक्त स्टार प्रवाहवर!
Leave a Reply