कणेरी: सिद्धगिरी हॉस्पिटल रिसर्च सेंटर कणेरी मध्ये महाराष्ट्र शासन आरोग्य विभागाच्या महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत कर्णबधीर रूग्नांसाठी मोफत तपासणी आणि आवश्यकतेनुसार ‘हेरिंग हेड मशिन’ ही मोफत दिले जाणार आहे. सुप्रसिद्ध न्यु साऊंड व्हिवो कंपनिच्या अद्यावत मॉडेलच्या मशिनवर ऑडीसॉलो जिस्ट हिलाल मुल्ला ही कर्णबधीराची तपासणी करणार आहेत. नुकतेच या सुवेधाचा शुभारंभ पूज्य मुप्पिन काडसिद्धेश्वर स्वामीजी यांच्या शुभहस्ते झाला . यावेळी त्यानी अधिकादीक लाभार्थीपर्यंत ही सुविधा पोहोचविण्यासाठी व्यापक मोहीम राबविण्याची सुचना केली व या संदर्भाने मार्गदर्शन ही केले. वैद्यकीय अधिक्षक डॉ. प्रविण नाईक यानी जनसेवा हीच इश्वरसेवा या ब्रिदवाक्याने पूज्यश्री अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामीजींच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत सिद्धगिरी हॉस्पिटलमध्ये अधिकाधिक सोई-सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहे. कर्णबधीर रूग्नांसाठी ही नविन सुविधा जिल्ह्यात प्रथमच महात्मा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत सुरु झाली असून इतरही रूग्नाना अल्पमुल्यात उपलब्ध असणार आहे. याचा लाभ घेण्याचे आवाहन त्यानी यावेळी केले. यावेळी ज्येष्ठ मेंदूउपचार तज्ञ डॉशिवशंकर मरजक्के यांच्यासह वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.
Leave a Reply