
कोल्हापुर: कोल्हापूर पंचक्रोशीत गेली दोन तपे विविध आंदोलने यशस्वीरित्या करणारे संजय दिनकरराव पाटील यांच्या सुवर्ण महोत्सवी वाढदिवसानिमित्त भव्य नागरी सत्कार आणि आंदोलन या स्मरणिकेचे प्रकाशन येत्या रविवारी 15 जुलै रोजी सकाळी 11 वाजता केशवराव भोसले नाट्यगृह येथे होणार आहे. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे त्रिपुरा चे राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील यांची प्रमुख उपस्थिती व अध्यक्षस्थानी खासदार राजू शेट्टी असणार आहेत अशी माहिती संजय पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आमदार सतेज पाटील यांच्यासह विजय देवणे, संजय पवार, वसंत मुळीक, कॉम्रेड दिलीप पवार, आनंद माने, कॉम्रेड चंद्रकांत यादव, राजेश लाटकर ,भरत रसाळे, डॉ. संदीप पाटील मदन पाटील यांच्या संयोजन समितीने आयोजन केले आहे. गेल्या वीस वर्षाच्या कालावधीत जवळपास 300 हून अधिक आंदोलने करून त्यातून जिल्हा परिषदेतील घोटाळ्यास जबाबदार असणाऱ्या 14 जणांना निलंबित करण्यात आले. याचबरोबर रॉकेल, पेट्रोल, पर्यावरण, शिक्षण, डान्स बार, गहू घोटाळा अशा प्रत्येक क्षेत्रात आंदोलने करून संबंधित अधिकारी – मंत्री यांच्याबरोबर चर्चा करून प्रसंगी वादविवाद करून स्वतःवर प्राणघातक हल्ला होऊनही असंघटित क्षेत्रातील घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला असे संजय पाटील यांनी सांगितले. याचीच पोचपावती म्हणून हा नागरी सत्कार आहे असेही ते म्हणाले. विविध विषयांवरील यशस्वी आंदोलनाचा आढावा घेणाऱ्या राजेंद्र मकोटे व बाबासाहेब खाडे यांनी संपादित केलेल्या आंदोलन या स्मरणिकेचे प्रकाशन या वेळी महापौर सौ. शोभा बोंद्रे यांच्या हस्ते होणार आहे. याप्रसंगी प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू, आमदार सतेज उर्फ बंटी पाटील, आमदार हसन मुश्रीफ, आमदार राजेश क्षीरसागर, आमदार चंद्रदीप नरके, आमदार सत्यजित पाटील, आमदार उल्हास पाटील, गटनेते शारंगधर देशमुख, सभागृह नेते दिलीप पवार, उपमहापौर महेश सावंत, सौ. प्रतिमा सतेज पाटील आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.पत्रकार परिषदेला करवीर पंचायत समिती माजी सभापतीप्रदीप झाम्बरे,युवा कार्यकर्ते योगेश हतलगे,सामाजिक कार्यकर्ते दिपक कांबळे, तानाजी मोरे,डी. डी.पाटील, बजरंग रणदिवे आदी उपस्थित होते.
Leave a Reply