
एखाद्या दिवशी अचानक सुटी मिळावी आणि सहजच एखादा सहलीचा प्लॅन ठरावा असं फार क्वचित घडतं. मात्र, हे जेव्हा घडतं, ती सहल कायमच लक्षात राहते. स्टार प्रवाहच्या ‘विठूमाऊली’ मालिकेच्या टीमला अशीच एक धमाल सहल करण्याची संधी नुकतीच मिळाली. सुटी मिळताच विठूमाऊलीच्या टीमनं थेट भंडारदरा गाठलं.मालिकेच्या टीमला आदल्या दिवशी रात्री अकरा वाजता कळलं, की उद्याचं शूट रद्द झालं आहे. मग सुटी मिळालीच आहे, तर ती सत्कारणा लावावी या विचारातून नियोजन सुरू झालं. बाकी काही करण्यापेक्षा मस्त पावसाळी सहल करावी असा प्लॅन ठरला. भंडारदऱ्याजवळच्या भावली गावात जाऊन विठूमाऊली टीमनं पावसाचा मनसोक्त आनंद लुटला.आम्ही सर्वांनी खूप धमाल केली, कामाचा शीण विसरायला लावून नवी ऊर्जा देणारी ही एक दिवसाची सहल होती,’ असं विठूमाऊली साकारणाऱ्या अजिंक्य राऊतनं सांगितलं.
Leave a Reply