
मराठीमध्ये नेहमीच विविधांगी विषयावरआधारित सिनेमे बनत असतात. विनोदी आणिआशयघनसिनेमांच्या तुलनेत उत्कंठावर्धककथानक असलेल्या सिनेमांची संख्या कमीअसल्याने अशा सिनेमांची प्रेक्षक आतुरतेनेवाट पाहात असतात. केवळ भारतातच नव्हे,तर जागतिक पातळीवर अशा सिनेमांचा फारमोठा चाहतावर्ग आहे. त्यामुळेचहॉलिवूडपासून बॉलिवूडपर्यंत आणिमराठीसारख्या प्रादेशिक सिनेसृष्टीमध्येहीउत्कंठावर्धक चित्रपट बनत असतात. आता‘हडळ’ हा नवीन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.शीर्षकावरून ‘हडळ’ हा जरी भयपटवाटत असला तरी हा सिनेमा भयावह नसूनक्षणोक्षणी उत्कंठा वाढवत समज-गैरसमजांच्याकक्षा ओलांडणारा आहे. ‘आर. डी. फिल्म्सप्रोडक्शन’ अंतर्गत निर्माते राजेश-दिनेश हीजोडी ‘हडळ’ या सिनेमाची निर्मिती करीतअसून राजेशदिनेश या जोडींचीही पहिलीचमराठी निर्मिती आहे. दिग्दर्शक राकेश भारद्वाजया सिनेमाचे दिग्दर्शन करणार असून कथा,पटकथा आणि संवादलेखन राकेश बबनदुर्योधन यांनी केलं आहे. या सिनेमाचा मुहूर्तनुकताच मुंबईतील माटुंगा येथील स्टेटसहॉटेलमध्ये मोठया थाटात संपन्न झाला. यासोहळयाला सुप्रसिद्ध लेखक अरविंद जगताप,अभिनेत्री स्मिता तांबे यांच्यासह सिनेमातीलकलाकार आणि तंत्रज्ञ मंडळीसह मराठी-हिंदीचित्रपटसृष्टीतील इतर मान्यवर मंडळीउपस्थित होती.या सिनेमाची कथा कोकणच्यानिसर्गरम्य भूमीत घडणारी आहे. या सिनेमातप्रेक्षकांना आवडणारंसारं काही आहे.कोकणाचं निसर्गसौंदर्य आहेच, पण त्याजोडीला एक सशक्त कथानकही आहे. त्यालाश्रवणीय संगीताची किनार जोडण्यात येईल.याला विनोदाची झालरही आहे, त्यामुळे सर्ववयोगटातील प्रेक्षकांसाठी हा सिनेमामनोरंजनाचं प्याकेज ठरेल असे दिग्दर्शकराकेश भारद्वाज तसेच राजेश आणि दिनेश यानिर्माते द्वयींचं म्हणणं आहे.मिलिंद शिंदे, संजय खापरे, विद्याधरजोशी, वर्षा धांदळे, अशोक कुलकर्णी,अभिषेक भामरे आदी कलाकार या सिनेमातमुख्यभूमिकेत दिसणार आहेत. नजीर खान यासिनेमाचे सिनेम्या टोग्राफर आहेत. याचित्रपटातील गीते सावतागवळी यांची असूनसंगीतकार संदिप डांगे या गीतांना संगीतबद्धकरणार आहेत. कुमार नीरज या सिनेमाचे संकलक असून समीर शिंदे कार्यकारी निर्मातेआहेत. देवेंद्र तावडे यांनी प्रॉडक्शन डिझाईनकेलं असून मेराज शेख प्रॉडक्शन मनेजरआहेत. मेकअप विजय पंडित, केशभूषाअपर्णा जाधव तसेच अतुल मर्चंडे प्रॉडक्शनकंट्रोलर अशी श्रेय नामावली आहे.
Leave a Reply