

थ्री स्टार एंटरटेनमेंट आणि नमस्ते एंटरटेनमेंट फिल्म्स या निर्मिती संस्थांनी ‘बे एके बे’ या सिनेमाची निर्मिती केली आहे. विकास भगेरीया आणि पूर्णिमा वाव्हळ-यादव या सिनेमाचे निर्माते आहेत. हेमा फाऊंडेशनचे महेंद्र काबरा आणि अनिता महेश्वरी यांची प्रस्तुती असलेल्या या सिनेमाची सहनिर्मिती प्रविण गरजे आणि चिंतामणी पंडित यांनी केली आहे. वर्तमान काळातील शिक्षणव्यवस्थेवर भाष्य करणाऱ्या या सिनेमाद्वारे दिग्दर्शक संचित यादव यांनी समाजातील सत्य परिस्थिती मांडण्याचा प्रयत्न केला आहे. दिग्दर्शनासोबतच या सिनेमाची कथा-पटकथाही संचित यादव यांनीलिहिली आहे. त्यावर अभिजीत कुलकणीं यांनी अर्थपूर्ण संवादलेखन केलं आहे.
समाजातील शिक्षणव्यवस्था आणि शिक्षकांची स्थिती दर्शवणारे काही सिनेमे आजवर प्रदर्शित झाले असलेतरी अद्याप दुर्लक्षित राहिलेल्या पैलूंवर प्रकाश टाकण्याचं काम ‘बे एके बे’ हा सिनेमा करणार असल्याचं दिग्दर्शक यादव यांचं म्हणणं आहे. ते म्हणाले की, शहरातील शिक्षणपद्धती काय आहे ती सर्वांनाच ठाऊक आहे. पण खेडोपाडयांतील शिक्षणव्यवस्थेकडे लक्ष द्यायला कोणालाच वेळ नाही. एखादा शिक्षक जर प्रामाणिकपणे आपलं काम करण्यासाठी झटत असेल तर त्याला कशाप्रकारे नाना समस्यांना सामोरं जावं लागतं हे चित्र देशाच्या कोणत्या ना कोणत्या कोपऱ्यात आजही पाहायला मिळत आहे. हेच चित्र आम्ही ‘बे एके बे’च्या माध्यमातून समाजासमोर आणण्याचा प्रयत्न केला आहे.
आशयघन कथानकाला अर्थपूर्ण संवाद आणि प्रसंगानुरूप सादरीकरणाची जोड देण्यात आली आहे. सुमधुरगीत-संगीताद्वारे ‘बे एके बे’चा प्रवास सुरेल बनवण्यात आला आहे. दर्जेदार निर्मितीमूल्ये, सहजसुंदर अभिनय आणि दूरदृष्टी ठेऊन केलेलं दिग्दर्शन यामुळे सिनेमा प्रेक्षकांवर प्रभाव पाडण्यात नक्कीच यशस्वी होईल असा विश्वास निर्मात्यांना वाटतो. या सिनेमातील चित्र केवळ महाराष्ट्रातील एका गावातील नसून शिक्षणापासून दुर्लक्षित राहिलेल्या अनेक खेडयांचं ते प्रतिनिधीत्व करणारं आहे. केवळ उपदेशाचे डोस न पाजता मनोरंजनाच्या माध्यमातून एक कटू सत्यजनतेसमोर मांडण्याचा हा एक स्तुत्य प्रयत्न आहे.
संजय खापरेसारखा कसलेला कलावंत या सिनेमातील मुख्य भूमिकेत असणं ही ‘बे एके बे’ची सर्वात मोठीजमेची बाजू आहे. आपल्या अभिनय कौशल्याद्वारे संजयने या सिनेमात साकारलेल्या माधव गुरूजी या व्यक्तिरेखेतीलपैलू सादर करण्याचं काम प्रामाणिकपणे केलं आहे. त्याच्या जोडीला जयवंत वाडकर, संचित यादव, पूर्णिमा वाव्हळ-यादव, संतोष आंब्रे, अतुल मर्चंडे आणि अरूण नलावडे यांच्या या सिनेमात प्रमुख भूमिका असून साहिल सितारे, प्रथम सितारे, वैदेही ओव्हाळ, स्नेहल भाताडे, सागर गुरव, संचित निर्मळे, पार्थ देशपांडे, अथर्व खारवरकर, साईराज कामेतकर, स्वप्नजा जाधव, समिषा स्लपे, प्राची मेस्त्री, पूजा पोटफाडे, नेहा पावसकर, अविष्कार शेडये आदि बालकलाकारांच्याही या सिनेमात भूमिका आहेत. ‘बे एके बे’चं गीतलेखन संचित यादव यांनी अभिजीत कुलकर्णा यांच्या साथीने केलं आहे. या गीतरचना संगीतकार विलास गुरव यांनी संगीतबद्ध केल्या आहेत. अतुल जगदाळे यांचं छायालेखन आणि कमल सैगल व विनोद चौरसिया या जोडीचं संकलन लाभलं आहे. देवेंद्र तावडे यांनी कला दिग्दर्शन, व्हिएफक्स शेखर माघाडे, तर संतोष आंब्रे यांनी नृत्य दिग्दर्शन केलं आहे. अतुल मर्चंडे या सिनेमाचे कार्यकारी निर्माते आहेत.
Leave a Reply