अनेक नाटकं, चित्रपट आणि मालिकांतून आपल्या अभिनयानं स्वत:ची ओळख निर्माण केलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री सुहास जोशी छोट्या पडद्यावर पुनरागमन करत आहेत. स्टार प्रवाहच्या ललित २०५ या नव्या मालिकेत त्या मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. स्टार प्रवाहची प्रत्येक मालिका काही ना काही वेगळेपण घेऊन येते. ‘ललित २०५’ ही मालिका एकत्रित कुटुंबावर आधारित आहे. सध्याच्या काळात असं एकत्र कुटुंब अभावानेच पाहायला मिळतं. आजीचा सहवास तर विरळ होत चाललाय. ‘ललित २०५’ मधून नात्यांमधला हरवलेला संवाद नव्याने शोधण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. सुहास जोशी या मालिकेत आजीच्या भूमिकेत दिसतील.स्टार प्रवाहनं कायमच मालिकांमध्ये जपलेलं वेगळेपण या नव्या मालिकेतही पहायला मिळेल, यात काहीच शंका नाही. ६ ऑगस्टपासून रात्री ८.३० वा. ‘ललित २०५’ ही नवी मालिका तुमच्या भेटीला येईल.
Leave a Reply