हाईकवर आषाढी एकादशी

 

हाईकने आषाढी एकादशीच्या निमित्ताने स्टीकर पॅक सादर केल्याचे आज जाहीर केले, आषाढी एकादशी प्रामुख्याने महाराष्ट्रात साजरा केला जाणारा धार्मिक उत्सव आहे, तसेच हिंदू पौराणिक कथांनुसार देशभरात इतर ठिकाणी याच काळात विष्णुदेवाला नमन केले जाते. या काळात वारकरी तब्बल २१ दिवस पायी चालत, पुणे जिल्ह्यातून पंढरपूरच्या विठोबा मंदिरात पोहोचतात. यंदा ते २३ जुलै रोजी तिथे पोहोचतील आणि आपल्या विठोबामाउलीचे दर्शन घेतील.
याबरोबरच भगवान विष्णु चार महिन्यांच्या गाढ झोपेतून एकादशीच्या दिवशी जागे होतात, असेही परंपरा सांगते. महाराष्ट्रातून वारकरी त्यांच्या पारंपरिक वेशात, उत्साहात भक्तीभावाने वारीसाठी निघतात आणि पढंरपुरकडे प्रस्थान करतात.
हाईक वापरकर्तेही आपल्या प्रियजनांबरोबर हा उत्सव साजरा करू शकतात, “शुभ आषाढी एकादशी’’ अशी अक्षरे असलेल्या शुभेच्छा त्यांना पाठवू शकतात, उत्सव साजरा करण्यासाठी साधे एसएमएस पाठवण्यापेक्षा हा एक चांगला मार्ग देण्यात आला आहे. खास यानिमित्ताने तयार करण्यात आलेला स्टीकर पॅक, अँड्रॉइड आणि आयओएस अशा दोहोंवर हाईक अॅपवरील स्टीकर शॉपमधून डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध आहे.
स्टीकर म्हणजे सामाजिक भावना प्रकट करणे
हाईकवर स्टीकर सर्वात लोकप्रिय फीचर आहे. हाईककडे ४० पेक्षा जास्त भाषांमधले २०,००० पेक्षा जास्त स्टीकर आहेत. भारतात चमकदार, रंगीत, पारंपरिकतेवर आधारित असे विविध शैलीसह १००० पेक्षा जास्त स्टीकर पॅक उपलब्ध आहेत, बॉलिवुड, कॉमेडी, सण, क्रीकेट, कबड्डी, स्थानिक म्हणी, भावना आणि अगदी एक्सक्युजेसचेही स्टीकर आहेत. याशिवाय हाईकवरील निफ्टी टेक्स टू स्टीकर या वैशिष्ट्यामुळे तुम्ही केलेल्या हाईक चॅटमधले मेसेज एका फनी स्टीकरमध्ये परावर्तित होतात. हे स्टीकर्स विविध भावना दर्शवणारे आहेत आणि तुम्हाला नेमकं काय वाटत आहे ते सांगणारे आहेत. सण-उत्सव आणि प्रादेशिक संदर्भांची प्रेम, हास्य आणि धमाल यांची स्टीकर्स हाईकवर सर्वात लोकप्रिय आहेत. प्रतिदिवशी तब्बल ३०० दशलक्षपेक्षा जास्त स्टीकर्सची देवाणघेवाण होते!
तुमचे संवाद अधिक बोलके करण्यासाठी अॅप स्टोअर किंवा प्ले स्टोअरमधून हाईक अॅप अगदी सहज डाउनलोड करू शकता. स्टीकर शॉपमध्ये पाहून तुम्ही स्टीकर पॅक शोधू शकता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!