स्टार प्रवाहच्या ‘नकळत सारे घडले’मध्ये स्वानंद किरकिरेंची हजेरी

 

स्टार प्रवाहच्या ‘नकळत सारे घडले’ या मालिकेत नुकतंच एका खास पाहुण्याने हजेरी लावली. हा पाहुणा होता सुप्रसिद्ध गायक-संगीतकार स्वानंद किरकिरे. अक्षय कुमारची प्रस्तुती असलेल्या चुंबक सिनेमाच्या प्रमोशनसाठी स्वानंदजी ‘नकळत सारे घडले’च्या सेटवर आले होते. या सिनेमात ते प्रसन्ना ही व्यक्तिरेखा साकारत आहेत. हाच प्रसन्ना आणि मालिकेतल्या प्रिन्स दादाची योगायोगाने भेट होते. त्यांच्यात गप्पाही होतात. झटपट पैसा कमावण्याच्या नादात कसं नुकसान होतं याचे धडेच प्रसन्ना प्रिन्सदादाला देतो. त्यामुळे प्रिन्स दादाचे डोळेच उघडतात. हा प्रसन्ना म्हणजे खुद्द स्वानंद किरकिरे… आपल्या अफलातून अभिनयानं स्वानंद किरकिरे यांनी‘नकळत सारे घडले’ मालिकेतील प्रसंग रंगवला आहे. त्यामुळे हा भाग नक्कीच मनोरंजक होणार आहे.स्वानंदजींसोबत काम करण्याचं स्वप्न ‘नकळत सारे घडले’या मालिकेच्या निमित्ताने पूर्ण झालंय. सीनपूर्वी खूप दडपण होतं मात्र स्वानंदजींनी मला खुप धीर दिला आणि सीन सहजरित्या पार पडला अशी भावना प्रिन्सची भूमिका साकारणा-या आशिष गाडेने व्यक्त केली.तेव्हा नकळत सारे घडले ही मालिका न चुकता पाहा सोमवार ते शनिवार सायंकाळी ७.30 वा. फक्त स्टार प्रवाहवर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!