
कोल्हापूर: दरवर्षीप्रमाणे २६ जुलै हा कारगिल विजय दिन म्हणून साजरा केला जातो. ‘सलाम कारगिल’ या उपक्रमाअंतर्गत अभिमानस फाउंडेशनच्यावतीने देशाबद्दल कृतज्ञतेची भावना व्यक्त करण्यासाठी २०१५ सालापासून विविध उपक्रम राबवले जातात. यावर्षी चार लाखाहून अधिक सॅटिन रिबन बँड कोल्हापूर सह गगनबावडा, सांगली, सातारा, पुणे, मुंबई, पणजी, रत्नागिरी, जयपूर, अजमेर अशा विविध ठिकाणी वितरीत करण्यात येणार आहेत अशी माहिती गौरव कोल्हापूरे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. मुलांमध्ये देशसेवेची भावना वाढीस लागावी हा यामागील उद्देश आहे असे डॉ. संदीप पाटील यांनी सांगितले. त्याचबरोबर रक्तदान शिबीर सारखे सामाजिक उपक्रमही राबवण्यात येणार आहेत. आत्तापर्यंत अभिमानस फाउंडेशनच्यावतीने राष्ट्रभक्तीपर टॅटूचे वितरण, कोल्हापूर कारगिल अशी बुलेट परिक्रमा असे कार्यक्रम राबवले गेले आहेत. यावर्षी राष्ट्रगीत, अकरा वेळा जय हिंद दोन मिनिट मौन अशा कार्यक्रमाचे आवाहन करण्यात आली आहे. वरील कार्यक्रम करून विद्यार्थ्यांचे समूह की फोटो पाठवण्याचे आवाहन केले आहे. तसेच हे फोटो www.salaamkargil.com तसेच सलाम कारगिलच्या फेसबुक पेजवर प्रसिद्ध करण्यात येततील. पत्रकार परिषदेस शशिकांत भालकर स्वप्नील नाईकनवरे उपस्थित होते.
Leave a Reply