
कोल्हापूर: २६ जुलै हा दिवस सर्वत्र कारगिल विजय दिन म्हणून साजरा केला जातो. या वर्षीही ” सलाम कारगिल ” या उपक्रम अंतर्गत अभिमानस फौंडेशनतर्फे आज विविध उपक्रम राबवण्यात आले. राष्ट्रीय सेनेदला बद्दल कृतज्ञतेची भावना व्यक्त करणे हा उद्देश ठेवून कार्यक्रम २०१५ सालापासून घेण्यात येतो. २०१५ साली कोल्हापूर ते कारगिल बुलेट परीक्रमा, २०१६ साली २. ५ लाख व २०१७ साली ४. २५ लाख राष्ट्रभक्तीपर टॅटू चे वितरण करण्यात आले होते. या वर्षी आदर्श प्रशाला या ठिकाणी मुख्याध्यापक आर.वाय पाटील आणि सहाय्यक शिक्षक,अभिमानास फौंडेशन चे शशिकांत भालकर, , अभिजित सुतार,अनिल यादव यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला.स्वागत गौरव कोल्हापूरकर यांनी व आभार डॉ संदीप पाटील यांनी मानले .विद्यार्थ्यांना सैनिकांशी प्रश्नोत्तरे करण्याची संधी मिळाली. निवृत्त सैनिक श्रीकांत लायकार ,बाजीराव पाटील,योगेश जोशी , सयाजी कुंभार यांनी सैनिकांचे जीवन , येणाऱ्या अडचणी , सैनिकी क्षेत्रातील संधी या बद्दल मार्गदर्शन केले व सलाम कारगिल बँड चे औपचारिक उदघाटन केले.
सकाळी टेंबलाबाई महाविद्यालय,आदर्श प्रशाला व महाराष्ट्र हायस्कुल येथे कारगिल विषयीचे उदबोधन , राष्ट्रगीत आणि मानवंदना देऊन कार्यक्रम करण्यात आला.’२६ जुलै सलाम कारगिल ‘असे ४.५ लाखहुन अधिक सॅटिन रिबन बँडचे विनामूल्य वाटप करण्यात आले .राष्ट्रगीत ,११ वेळा जयहिंद व २ मिनिट मौन असा कार्यक्रम कोल्हापूर, गगनबावडा ,सांगली, सातारा, पुणे ,मूंबई ,पणजी ,म्हापसा ,लांजा , रत्नागिरी ,उदयपूर, जयपूर,कोटा आणि अजमेर येथे साजरा करण्यात आला .
Leave a Reply