
कोल्हापूर: विवेकानंद कॉलेज मध्ये शैक्षणिक वर्ष २०१८-१९ पासून यु.जी.सी. ने “एनीमेशन व फिल्म मेकिंग” चा तिन वर्षाचा बी.व्होक. पदवी अभ्यासक्रम तसेच दोन वर्षाचा “एडवांन्स डिप्लोमा इन फोटोग्राफी” कोर्स सुरु करनेस मान्यता दिली असून त्यासाठी महाविद्यालायास अनुदान मंजूर करण्यात आलेले आहे.
यु.जी.सी. कडून ‘स्वायत्त महाविद्यालायाचा’ दर्जा मिळालेल्या कोल्हापूर येथील विवेकानंद कॉलेज येथे यु. जी. सी. च्या अनुदानामधून शिवाजी विद्यापीठ व शासन मान्यता प्राप्त, कौशल्यावर आधारीत बी. व्होक. ग्राफिक डिझाइन व फाउंड्री टेक्नोलॉजी विभागाचे पदवी व पदवीका कोर्सेस गेली ५ वर्ष सुरु आहेत. तसेच कम्युनिटी कॉलेज अतर्गत डिप्लोमा इन फाउंड्री टेक्नोलॉजी हा अभ्यासक्रम फाउंड्री उद्योगक्षेत्रामधील काम करणारया कर्मचारयासाठी सुरु आहे.
सदरचे व्यवसायीक कोर्सेस सुरु करण्यासाठी यु. जी. सी. च्या अनुदानातून महाविद्याने अद्ययावत प्रयोगशाला निर्माण करून सर्वसामान्य मुलांसाठी अत्यंत महागड्या व्यावसायीक कोर्सेसची अत्यल्प फी मध्ये शिक्षण घेण्याची सुवर्णसंधी उपलब्ध करून दिलेली आहे. आत्तापर्यंत पदवी घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांना विविध उद्योग क्षेत्रामध्ये काम करण्याची तसेच स्वता:चा व्यवसाय सुरु करण्याची संधी मिळालेली आहे.
या प्रसंगी बोलताना श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष मा. प्रचार्य अभयकुमार सालूंखे यांनी सांगितले की, एनीमेशन व फिल्ममेकिंग या क्षेत्रामध्ये पदवी घेण्यासाठी खासगी संस्थामधे लाखांमध्ये फी मोजावी लागते व त्यामुळे अनेक विद्यार्थी आर्थिक परिस्थितिमुले करिअर करण्याची इछा असूनही वंचित राहिलेले आहेत आशांसाठी ही एक फार मोठी संधी निर्माण झालेली आहे. महाविद्यालायामधे सुसज्य प्रयोगशाला उभी करण्यात येणार असून या क्षेत्रामधील तज्ञ प्राध्यापकांची नेमणूककरण्यात येणार आहे. विविध संस्थांबरोबर सहकार्याचा करार करण्यात आलेला असून हा पदवी अभ्यासक्रम विद्यापिठामध्ये प्रथमच सुरु होणार असून यास विद्यार्थ्याची प्रचंड मागणी असलेमुले या कोर्ससाठी अत्यल्प फी ठेवण्यात आलेली आहे. कम्युनिटी कॉलेज कोर्सेसना यु. जी. सी. च्या अनुदानातून शिष्यवृत्तीही देण्यात येणार आहे.
महाविद्यालायामधे अत्याधुनिक डिजिटल फोटो स्टूडियो उभा करण्याचे काम तद्न्याच्या मार्गदर्शनाखाली सुरु करण्यात आले असून तो पश्चिम महाराष्ट्रातला एकमेव असा असणार आहे. त्यामुले या क्षेत्रामधील आधुनिक तंत्रन्यान विद्यार्थ्याना शिकता येणार आहे. या सर्व कोर्सेसची प्रवेश मर्यादा ही फक्त ५० जागांसाठी असून शासनाच्या नियमाप्रमाणे राखीव जागा राहणार आहेत.
कोल्हापूर ही कलानगरी असून ती चित्रपटाची पंढरी आहे. चित्रपटसृष्टीला सलग्नित असे हे कोर्स असून त्यामधे प्रत्यक्ष प्रत्याक्षिकावर आधिक भर दिलेला आहे. ‘कौशल्यावान विद्यार्थी- खुशल कुटुंब’ या संकल्पनेवर आधारीत या पदवी अभ्यासक्रमानंतर सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षा देता येतातच तसेच उच्च शिक्षण घेता येते. बी. व्होक पदवी ही इतर बी. ए., बी. कॉम., बी. एस्सी. सारखीच समकक्ष आहे. या कोर्सेसला वयाची कोणतीही अट नसते. व प्रवेशावेली कोणत्याही ‘ग्याप’ सर्टिफिकेटची आवश्यकता नसते. सुजाण पालकानी या संधीचा फायदा घेउन आपल्या पाल्यास त्याच्या आवडीचे शिक्षण देण्यासाठी त्वरित प्रवेश घ्यावा असे आवाहन महाविद्यालायाचे प्रचार्य डॉ. एस. व्हाय. होनगेकर यानी यावेळी आयोजीत करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत केले.
या प्रसंगी प्रा. एस. बी. गायकवाड नोडल ऑफिसर- बी. व्होक व कम्युनिटी कॉलेज, प्रा. राहुल इंगवले विभाग प्रमुख – ग्राफिक डिझाइन, प्रा. सतीश उपलाविकर, संकेत वाठारे विभाग प्रमुख – फौंड्री टेक्नोलॉजी, प्रा. धीरज निंबालकर, प्रा. कु. श्रध्दा शिंदे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आभार प्रा. सतीश उपलाविकर यांनी व्यक्त केले व प्रस्ताविक अक्षय थोरवत यांनी सादर केले.
Leave a Reply