स्टार प्रवाहच्या ‘लेक माझी लाडकी’चा २९जुलैला महाएपिसोड

 

स्टार प्रवाहच्या ‘लेक माझी लाडकी’मालिकेमध्ये लवकरच बारशाचा कार्यक्रम रंगणार आहे. या कार्यक्रमासाठी संपूर्ण कुटुंब एकत्र आलंय. बाळाचं नाव काय ठेवायचं याची सर्वांमध्ये उत्सुकता आहे. मात्र याच कार्यक्रमात इरावतीसमोर एक सत्य उघड होणार आहे. ज्या बाळाचं इतकं कौतुक होतंय ते बाळ सानिकाचं नसल्याचं धक्कादायक वास्तव इरावतीसमोर येणार आहे. हे बाळ नेमकं कुणाचं आहे? सानिकापासून हे सत्य का लपवण्यात आलं? मीराचा या सर्वाशी काय संबंध आहे? या सगळ्या प्रश्नांची उत्तर महाएपिसोडच्या भागात उलगडणार आहेत.अत्यंत भावनिक असा हा महाएपिसोड असणार आहे. प्रत्येक आईसाठी तिचं बाळ हे तिचा प्राण असतो. ज्या बाळासाठी सानिकाने असंख्य स्वप्न रंगवली होती ते बाळ आपलं नाही हे सत्य सानिकासमोर येईल का? ती या सत्याचा स्वीकार कसा करेल? हे पाहण्यासाठी‘लेक माझी लाडकी’चा महाएपिसोड नक्की पहा २९ जुलैला दुपारी १ आणि संध्याकाळी ७ वाजता फक्त स्टार प्रवाहवर.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!