
गेली अनेक वर्षे मराठा समाज आरक्षणासाठी सनदशीर मार्गाने आंदोलने करत आहे. गेल्या वर्षी संपुर्ण महाराष्ट्रातून ५८ मुक मोर्चे काढून सरकारचे लक्ष वेधण्यासाठी प्रयत्न केले होते.
हे मोर्चे अतिशय शांततेत काढून मराठा समाजाने जगासमोर एक आदर्श निर्माण केला होता. परंतू मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न न सुटल्यामूळे या समाजाने पुन्हा आंदोलनास सुरुवात केली आहे. आज पर्यंत या मध्ये मराठा समाजातल्या दोन युवकांनी आत्महत्या केली आहे. मराठा समाजाला पात्रता असून ही आरक्षणाच्या अभावी शिक्षणामध्ये,नोकऱ्यांमध्ये संधी मिळत नसल्याने या समाजामध्ये प्रचंड असंतोष खदखदत आहे.
कधीकाळी संपन्न असलेला हा समाज स्वांतंत्र्यानंतर आरक्षणाच्या अभावी अतिशय हालाखीच्या परिस्थितीला सामोरे जात आहे.
राजर्षी शाहू छत्रपती महाराजांनी २६जुलै १९०२मध्ये मागास समाजासाठी ५०%आरक्षण जाहीर केले होते. महाराष्ट्रात व देशात ऐक्य प्रस्थापित व्हावे तसेच मराठा समाजाच्या आरक्षणासाठी पक्षीय राजकारण सोडून देशाच्या सर्वोच्च सभागृहाच्या प्रांगणात असलेल्या राजर्षी शाहू छत्रपती महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी व महाराष्ट्रात चाललेल आंदोलन शांततेच्या मार्गाने करावे ही विनंती करण्यासाठी सर्व पक्षीय खासदारांना एकत्रीत यावे म्हणून खा.संभाजीराजेंच्या वतिने आज आवाहन करण्यात आले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत आज संसदेच्या प्रांगणात सर्वपक्षीय खासदार उपस्थित होते.
Leave a Reply