
कोल्हापूर : एअर डेक्कन, ही भारतातील पहिली देशांतर्गत बजेट कॅरियर म्हणून विकसित झालेली कंपनी असून,तिच्यातर्फे महाराष्ट्रातील कार्यचलनाला २९ जुलै २०१८ पुन्हा सुरुवात करण्यात आली.एअर डेक्कनद्वारे `उडान’ (उडे देश का आम नागरिक) योजनेअंतर्गत महाराष्ट्रात पुणे,नाशिक, मुंबई,जळगाव आणि कोल्हापूर आदी शहरांतर्गत उड्डाणे पुन्हा एकदा सुरू करण्यात येत आहेत.
याचा प्रवासी,पर्यटक आणि व्यावसायिक समुदायाला योग्य लाभ होणार आहे. नाशिक ते मुंबई (रस्त्यावरून १७० किमी) प्रवास रस्त्यावरून पाच ते सहा तासांचा होतो, तो या सेवेमुळे केवळ ३० मिनिटे इतका कमी होणार आहे. सामान्य माणसाने विमान सेवा वापरावी हे पंतप्रधानांचे स्वप्न एअर डेक्कनने प्रत्यक्षात उतरवले आहे.
या निमित्ताने, एअर डेक्कनचे व्यवस्थापकीय संचालक आणि जीएसईसीचे कार्यकारी संचालक श्री.शैशव शाह म्हणाले की, “पुणे, नाशिक,जळगाव आणि कोल्हापूर आदी शहरांना मुंबईशी जोडणारे महाराष्ट्रातील उड्डाण मार्ग आम्ही पुन्हा सुरू करत आहोत. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अधिपत्याखालील उडान योजना अतिशय चांगली योजना आहे.सामान्य माणूस परवडणाऱ्या किंमतीतील आणि सुलभ मार्गाच्या हवाई मार्गाचा अवलंब करू लागल्यास अर्थव्यवस्थेचा प्रामुख्याने विकास होणार आहे. देशाच्या विमान क्षेत्रातील या ऐतिहासिक क्षणाचा आम्ही भाग झालो याचा आम्हाला अतिशय आनंद आहे.’’
उडानमुळे आपल्या देशातील नागरिकांसाठी विमान प्रवास परवडणाऱा आणि विस्तृत मार्गाचा होणार आहे. हे ध्येय गाठण्यासाठीएअर डेक्कन सक्षम आहे. या विमानकंपनीने२०१७ मध्ये तब्बल पाच वर्षांनंतर पुन्हा एकदा विमान फेऱ्यांना सुरुवात केली आहे, तसेच या वर्षी मार्चमधल्या बिडिंगच्या पहिल्या फेरीत रिजनल कनेक्टिव्हिटी स्कीम (आरसीएस)च्या प्रक्रिया राबवण्याचे हक्क जिंकले आहेत.देशभरातील १२८ मार्ग कंपनीने मिळवले आहेत, यात महाराष्ट्रस्थित नऊ मार्गांचा समावेश आहे. या धर्तीवर महाराष्ट्रातील शहरांमध्ये प्रादेशिक कनेक्टिव्हिटी योजनेला सुरुवात करण्याने एअर डेक्कनचा विकास होणार आहे.
सामान्यांना परवडणाऱ्या किंमतीत विमान प्रवास करता यावा, पर्यटनाला चालना मिळावी,रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात आणि संतुलित प्रादेशिक विकास व्हावा अशी रिजनल कनेक्टिव्हिटी स्कीमची उद्दिष्ट्ये आहेत.याबरोबरच वंचित आणि दुर्लक्षित विमानतळांना जीवनदान देण्याचाही हेतू यामागे आहे, असेही शाह म्हणाले.
Leave a Reply