
कोल्हापूर :दरवर्षी टाटा मोटार्स पुणे येथे २९ जुलै रोजी जे.आर. डी. टाटा जयंती गुणवत्ता दिन म्हणून साजरी केली जाते .गुणवत्ता हा जीवनाचा एक भाग असून उत्तम गुणवत्तेची मानके साध्य करणाऱ्या व्यक्तींचा गौरव करणे यासाठी विविध पारितोषके गुणवत्ता दिनी प्रदान करण्यात येतात.मात्र यावर्षी टाटा मोटर्सने आपल्या इतिहासात कधीही न केलेला असा एक वेगळा सन्मान केला.कारण त्यांनी ज्यांचा सन्मान केला ती व्यक्ती टाटा मोटार्सची कर्मचारी नसून सुद्धा टाटा व टाटा मोटार्सवर निस्सीम व निस्वार्थी प्रेम करणारी कोल्हापूरच्या सामान्य कुटुंबातून आलेली व्यक्ती होती .आवड व संशोधक वृत्तीच्या जोरावर त्याची इन्जिनिअरिंग ची त्यांची वेगळीच हातोटी आहे .
दहा वर्षापूर्वी त्यांनी टाटाची २०७ गाडी विकत घेतली आणी सवयीप्रमाणे त्यात काही बदल केले .पुढे असे केलेले उपयुक्त व रचनात्मक बदल त्यांनी ईआरसी आणि एनपीआय च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दाखवले . जेव्हा झेनोन आर एक्सहि गाडी भारतात अनावरण करण्यात आली तेव्हा त्या गाडीच्या कम्प्लेंटबद्दल कोल्हापूरच्या ग्राहकात चर्चा झाली. लोहार साहेबांच्या हे लक्ष्यात आले .आपण जे बदल २०७ या गाडीत केले किंवा आणखी काही वेगळ्या पद्धतीचे बदल झेनोन आर एक्स मध्ये केले तर ग्राहकांच्या मनात झेनोन बद्दल नक्कीच आदर निर्माण होईल .म्हणूनच २०७ मधील बदलांच्या प्रेझेनटेशनच्या वेळी त्यांनी हा प्रस्ताव वरिष्ठांनाच्या पुढे मांडला .२०७ गाडीत केलेले बदल पाहून ईआरसी ने त्यांना झेनोन आर एक्स हि गाडी अधिकृतरीत्या देऊ केली .दीड महिन्याच्या अथक परिश्रमानंतर त्यांनी सुधारित झेनोन आर एक्स गाडी विनामूल्य बनवून डेली .टाटा मोटार्सने हे बदल आपल्या झेनोन योद्धा या वाहनात केले आहेत. श्रीकृष्ण शामराव लोहारांच्या महत्वपूर्ण योगदानाबद्दल टाटा मोटार्सने त्यांना भारतरत्न जे.आर .डी. टाटा क्वालिटी पुरस्कारने सन्मानित केले .हा पुरस्कार श्री एच जी रघुनाथ , टायटन कंपनीचे माजी चीफ एक्झूक्टीव्ह ऑफिसर व सध्या टाटा सन्सचे स्वतंत्र सल्लागार यांनी प्रदान केला. सतीश बोरवणकर ,एक्झूक्टीव्ह डिरेक्टर ( क्वालिटी ) आणि सिओओ यांनी त्यांच्या संदेशामध्ये उत्पादन विभागातून आलेल्या सुचानाबद्दल गौरोवोद्गार काढले.
Leave a Reply