
कोल्हापूर: ( राजेंन्द्र मकोटे ) सध्या महाराष्ट्रात ऐरणीवर असलेल्या मराठा आरक्षण प्रश्नी राज्य शासनाची भुमिका प्रामाणिक व पारदर्शक नाही असा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.कोल्हापूरात आज त्यांनी हाँटेल सयाजी मध्ये पत्रकाराशी संवाद साधताना आपली परखड मते व्यक्त केली.निवडणूकीत जाहीर आश्वासने देऊन ही गेली अडीच – तीन वर्षे सुरु असलेल्या या आंदोलनाची वेळीच दखल न घेता राज्य सरकारने ही तणावाची परिस्थिती आणली आहे ,असे सांगत त्यांनी या मध्ये गडकरी सारखे ज्येष्ठ नेते पुनः शासकीय नोकऱ्याच नाहीत अशी विधाने करुन आगीत तेल ओतत आहेत,अश्या शब्दांत त्यांनी नाराजी व्यक्त केली.गेली दीड महिना विद्यमान सार्वजनिकरित्या राखीव आहेत,हे नेतृत्व बदलाचे संकेत आहेत का,असा ही सवाल त्यांनी केला.मुंबईतील शिव स्मारकाची उंची संदर्भात राज्य सरकारची भुमिका दबावाखाली असल्याचे मत ही त्यांनी व्यक्त केले.गुगल कंपनी वा राज्य शासन या दोघापैकी एक जण नक्कीच या संदर्भातील सध्यासाठी दोषी आहे,असे ही मत शेवटी चव्हाण यांनी नोंदवले.या वेळी सुरेश कुराडे,पाटील यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
Leave a Reply