
कोल्हापूर: प्रधानमंत्री आवास योजनेची माहिती मिळावी तसेच या घरांसाठी प्रस्ताव कसा करावा याची माहिती मिळावी यासाठी कोल्हापूर क्रीडाईतर्फे रेसिडेन्सी क्लब इथं मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आल होत. या कार्यशाळेचे उदघाटन पुणे म्हाडाचे अध्यक्ष समरजित घाटगे यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थित झाले. या उदघटनाप्रसंगी बोलतांना म्हाडाचे अध्यक्ष समरजित घाटगे यांनी प्रधानमंत्री आवास योजनेच्या गृहप्रकल्पसाठी क्रीडाईने आपल्याला आवश्यक असलेल्या बाबींबाबत पत्र द्यावे ते मुख्यमंत्र्यांना देऊन त्याचा पाठपुरावा करू. प्रत्येक महिन्याला येणाऱ्या प्रस्तावावर चर्चा करू, कोल्हापूरमध्ये या प्रधानमंत्री आवास योजनची जास्तीत जास्त घरे व्हावीत यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत. यासाठी जास्तीत जास्त प्रस्ताव पाठवावेत अस अवाहन समरजित घाटगे यांनी केलं.
पुणे म्हाडा सीईओ विवेक लहाने यांनी कोल्हापूरला खाजगी कंपन्या आणि सरकारच्या माध्यमातून प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यासाठी कोल्हापूर विभागातून जास्तीत जास्त प्रस्ताव सादर करावेत अस अवाहन केलं.
यावेळी म्हाडाचे कार्यकारी अभियंता यांनी पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनद्वारे प्रधानमंत्री आवास योजनेची माहिती दिली. यावेळी या योजनेची परिपूर्ण माहिती देताना त्यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी शहरातील लोकांना घरे मिळावीत यासाठी ही योजना सुरू केली. राज्यातल्या 382 शहरात ही योजना लागू आहे. याची यादी ऑनलाईन जाहीर करण्यात आली आहे. राज्य शासनाचा एकच उद्देश आहे. जिथं नागरीकरण झाले आहे तिथं ही घरे सकारावीत. या योजनेसाठी केंद्र सरकारकडून आर्थिक दृष्टया दुर्बल घटकांना केंद्र सरकार दीड लाख आणि राज्य सरकार एक लाख रुपयांचे अनुदान देते. स्वतःच्या जागेवर प्रधानमंत्री आवास योजनेसाठी प्रस्ताव करून तो नगरपरिषदेकडून पाठविला तर त्यालाही अडीज लाख रुपये अनुदान मिळते. यावेळी कोल्हापुर प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवराज पाटील, क्रीडाई कोल्हापूरचे अध्यक्ष महेश यादव, राजीव परीख, सचिन ओसवाल,म्हाडाचे अभियंता विवेक पाटील, अशोक पाटील उपस्थिित होोते
Leave a Reply