विनायक गुदगेची आत्महत्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला जोडली जाऊ नये:महेश जाधव

 

कोल्हापूर: काल झालेली विनायक गुदगेची आत्महत्या हि अत्यंत दुर्देवी घटना आहे. त्यांचे कुटुंबांमध्ये कोसळलेल्या आपत्ती मध्ये मी व सरकार सहभागी आहोत. अशा प्रकारच्या होत असलेल्या आत्महत्यांना मराठा आरक्षणाला जोडल्या जावू नयेत. काल विनायकची आत्महत्या झाल्यानंतर पोलीस प्रशासनाने घेतलेल्या त्याच्या जबाबामध्ये विनायक हा गेले कित्येक महिने नैराश्यगर्तेत होता आणि त्या नैराश्यातून त्यांनी आत्महत्या केली असा जबाब नोंदविला असताना कोल्हापूरातील काही आंदोलक मुख्यमंत्री आणि कोल्हापूरचे पालकमंत्री यांचे विरोधात बोलत असतात. मुळात कायद्याच्या तांत्रिक अडचणीमध्ये हा आरक्षणाचा मुद्दा असून या न्यायालीन लढ्याला राज्यसरकार पूर्णता ताकदीनीशी मराठ्यांना आरक्षण देण्याच्या मुद्यावर ठाम असल्यामुळे राज्यातील व देशातील विधी तज्ञांचा सल्ला घेऊन यावर मार्ग काढणेचा प्रयत्न करत आहेत. मागासवर्ग आयोगामार्फत मराठा समाजाचा मागासले पणाचा कायदेशीर अहवाल देत नाहीत तोपर्यंत प्रत्यक्ष आरक्षण कायद्याच्या चौकटीत टिकणार हे स्पष्ट झालेमुळे राज्य सरकारने मागासवर्ग आयोगाची स्थापना केली या आयोगाने अभ्यास, विविध सर्वेक्षण करून सुमारे १८६०००/- निवेदने आणि ऐतिहासिक पुरावे सादर केले त्यामुळे येणारा आयोगाचा अहवाल महत्वपूर्ण ठरणार आहे तो प्राप्त होताच आरक्षणाचा प्रश्न निर्णायक ठरणार आहे यासाठी मागील आठवड्यातच मागासवर्ग आयोगाला स्वत: पालकमंत्री महोदयांनी व शालेय शिक्षण मंत्री महोदयांनी प्रत्यक्ष भेटून मागासवर्ग आयोग स्वायत्त असून त्यामुळे राज्यसरकार त्यास निर्देश देवू शकत नाही हि तांत्रिक बाब सर्वज्ञात आहे. तरी सुद्धा उशिरात उशिरा संपूर्ण कायदेशीर प्रक्रिया नोव्हेंबर पर्यंत पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे. असे असताना महाराष्ट्रातील काहीजण जाणीवपूर्वक सदरचे आंदोलन भडकवत ठेवण्याचा प्रत्यन करत आहेत.

कोल्हापूरच्या बाबतीत बोलायचे झालेस स्वत:चे मतदार संघात आरक्षण आंदोलनातून बाजूला ठेवलेले नेते कोल्हापुरात भाषण बाजी करताना दिसतात. सध्या कोल्हापूर येथे सुरु असलेले हे आंदोलन गेली दहा-बारा दिवस जरी सुरु असले तरी मुद्दम काही लोक हे आंदोलन चिघळून असमंजस पणाची भूमिका घेत आहेत हे योग्य नसून कायमस्वरूपी टिकावू आरक्षण देणे हि सरकारची बांधिलकी आणि त्या सरकारचा शब्द आहे. आणि त्या सरकारचा आणि त्या पक्षाचा प्रमुख म्हणून मी आपणांस सांगू इच्छितो की, मा.मुख्यमंत्री यांनी नोव्हेंबर अखेर मराठा समाजाला सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता करून आरक्षण दिले जाईल असे सांगितले आहे. त्यामुळे सर्व आंदोलकांनी त्यावर विश्वास ठेवावा जर का नोव्हेंबर अखेर आरक्षण मिळाले नाही तर याहीपेक्षा उग्र आंदोलन करू आणि मी एक स्वत: मराठा म्हणून या आंदोलनामध्ये आग्रभागी असेन. त्यामुळे मी आपणा सर्वांना हात जोडून विनंती करतो की, सदरचे आंदोलन हे शांततेने आणि संयमाने हाताळावे असे अवाहन करीत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!