
कोल्हापूर: मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून गेले 20 दिवस ऐतिहासिक दसरा चौक येथे ठिय्या आंदोलन सुरू आहे. पण अजूनही सरकारने कोणत्याही प्रकारची ठोस भूमिका घेतली नाही. यासाठी आज 9 ऑगस्ट क्रांती दिन यादिवशी ठोक मोर्चा चे आयोजन करण्यात आले.लाखो च्या संख्येने आज मराठा बांधव आणि भगिनी दसरा चौक येथे जमा झाले. संपूर्ण परिसर एक मराठा लाख मराठा, जय भवानी जय शिवाजी या घोषणांनी दणाणून गेला. भगवे झेंडे, टोप्या परिधान करून लोक रस्त्यावर उतरले होते. संपूर्ण परिसर भगवा झाला होता.
तर शहरात येणाऱ्या एस टी बसेस नुकसान होऊ नये म्हणून बंद ठेवण्यात आल्या होत्या.शाळा, महाविद्यालय,दुकाने बंद करण्यात आली होती. रिक्षा, केएमटी ही बंद होत्या.संपूर्ण शहरात शुकशुकाट होता. लोकांनी उस्फुर्त पणे या बंद मध्ये सहभाग घेतला.
इतके दिवस आंदोलन सुरू होते पण सरकारला जाग आली नाही. वेळ पडल्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही भेटू. आजचा आवाज दिल्लीपर्यंत पोहचणार हे नक्की आहे. शासनाने मराठ्यांच्या व्यथा लक्षात घेतल्या पाहिजेत. भारताच्या राज्यघटनेत वेळीच बदल करून मराठयांना आरक्षण द्या अशी मागणी कोल्हापूर चे शाहू महाराज छत्रपती यांनी यावेळी केली.
Leave a Reply