कोल्हापूर : जिल्ह्यातील महिलांच्या कला-गुणांना वाव मिळावा, त्यांनी बनवलेल्या वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध व्हावी, या उद्देशाने कोल्हापुरात उद्योजिका बिझनेस एक्स्पोचे आयोजन करण्यात आले आहे. या एक्स्पोसाठी भागीरथी महिला संस्था, रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊन, इनरव्हील क्लब ऑफ कोल्हापूर आणि मुक्ता मंच यांनी पुढाकार घेतला आहे. १२ आणि १३ ऑगस्ट रोजी हॉटेल पॅव्हलियन येथे या एक्स्पो मध्ये बचत गटांचे स्टॉल, कंझ्युमर्स स्टॉल,खाद्य पदार्थांचे स्टॉल, तज्ञांची व्याख्याने आणि विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा सौ. अरूंधती महाडिक यांनी पत्रकार परिषदेत दिली.
कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक महिला बचत गटाच्या माध्यमातून विविध वस्तूंचे उत्पादन केले जाते. या वस्तूंना बाजारपेठ मिळावी, तसेच महिलांच्या कला-गुणांना वाव मिळावा, या उद्देशानं कोल्हापुरात उद्योजिका बिझनेस एक्स्पोचे आयोजन करण्यात आले आहेत. १२ आणि १३ ऑगस्ट रोजी हॉटेल पॅव्हेलियन येथे हा एक्स्पो होणार आहे. १२ ऑगस्टला सायंकाळी ४ वाजता उद्घाटन सोहळा संपन्न होणार आहे. या बिझनेस एक्स्पो मध्ये महिला बचत गटांचे विविध स्टॉल्स लावण्यात येणार आहेत. तसेच विविध कंझ्युमर्स स्टॉल्सद्वारे जीवनावश्यक वस्तू, गृहसजावटीच्या वस्तू, कपडे खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. जीभेचे चोचले पुरवणारे खाद्य पदार्थांचेही स्टॉल्स या प्रदर्शनात असणार आहेत. महोत्सवादरम्यान विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आलंय. १२ ऑगस्ट रोजी दुपारी १ ते ३ या दरम्यान अंब्रेला पेंटिंग स्पर्धा संपन्न होणार आहे. त्याच दरम्यान मॉम अँड कीड कॉम्पिटिशनचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी ६ ते ८ या दरम्यान कराओके ट्रॅकवर गायन स्पर्धा होणार आहे. १३ ऑगस्ट रोजी १ ते ३ दरम्यान रक्षाबंधन थाली डेकोरेशन स्पर्धा होणार आहेत. त्याचदरम्यान ग्रुप डान्स स्पर्धा देखील संपन्न होणार आहेत. स्पर्धेत सहभागी होणार्यांना २५ हजार रुपयांपर्यंतची बक्षिसे दिली जाणार आहेत. महोत्सवादरम्यान १२ ऑगस्ट रोजी कचरा व्यवस्थापन मार्गदर्शन या विषयावर अनुराधा सामंत, देवदत्त नाईक हे मार्गदर्शन करणार आहेत. तर १३ ऑगस्ट रोजी महिला बचत गटांच्या माध्यमातून यशस्वी उद्योजकतेकडे वाटचाल या विषयावर नाशिकचे कृष्णा पाटील आणि अकलूजच्या सविता वोरा यांचे मार्गदर्शन होणार आहे. या कार्यक्रमासाठी जी. एस. चहा हे प्रायोजक म्हणून लाभले आहेत. तर माध्यम प्रायोजक म्हणून चॅनल बी आणि रेडिओ सिटी काम पाहत आहेत असे सौ. अरूंधती महाडिक यांनी सांगितले. या एक्स्पो दरम्यान मिस कॉल द्या आणि बक्षिसं जिंका, ही योजना सुरू करण्यात येणार असून, या योजनेअंतर्गत दर तासाला भाग्यवान ग्राहकाला बक्षिस मिळणार आहेत, या योजनेसाठी बालाजी कलेक्शन, अग्रवाल गोल्ड आणि हॉटेल अमृत हे प्रायोजक असल्याचे सौ. महाडिक यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा शर्मिष्ठा चौगुले, रोटरी मिड टाऊनचे अध्यक्ष निशिकांत सरनाईक, मुक्ता मंचच्या अध्यक्षा सुवर्णा गांधी उपस्थित होत्या.

Leave a Reply