कोल्हापूर: वोव्हन मिस्ट्रीज हा अतिशय फेमस ब्रॅण्ड आहे. मी याच ब्रँडचे कपडे परिधान करते. नाशिक, पुणे, मुंबई, हैदराबाद यानंतर कोल्हापुरात रुई क्रिएशन आयोजित वोव्हन मिस्ट्री हे कलात्मक प्रदर्शन हॉटेल सयाजी येथे भरवण्यात आले आहे. या प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेत्री निर्माती दिग्दर्शिका मृणाल कुलकर्णी यांनी वोव्हन मिस्ट्री ज याबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या. या प्रदर्शनात विविध पारंपारिक आणि आधुनिक साड्या, दुपट्टे, दागिने, बटवे गृहसजावटीच्या कलात्मक वस्तू यांचा देखणा नजारा पाहायला मिळणार आहे. या सगळ्या कलाकृती मध्ये वापरलेला पुरातन वस्त्रांचा खजिना डोळे दिपवणारा आहे. भारतातील गावागावातील विणकरांचे कौशल्य प्रत्यक्ष अनुभवण्याची संधी कोल्हापूरकरांना मिळालेली आहे.या प्रदर्शनातील वस्त्रे दागिने, गृहसजावट वस्तू या आपल्या घरातील अमूल्य ठेवा ठरतील.एकमेवाद्वितीय अश्या वस्तू व वस्त्रे या प्रदर्शनात उपलब्ध आहेत. जुना कशिदा विणलेले वस्त्रे आजकाल खूप कमी बघायला मिळतात तसेच साड्यांची भरपूर व्हरायटी यामध्ये भारतातील कलेची परंपरा जपणाऱ्या बनारस, येवला, कांचीपुरम अशा विविध ठिकाणाहून ही वस्त्रे बनवून घेतलेली आहेत. दोन राज्यांची एकत्रित परंपरा वस्त्रांच्या स्वरूपात पहायला मिळणार आहे. महिलांसाठी अतिशय आकर्षक डिझाईन भारतीय कारागिरांनी बनवलेले आहेत. शोभना दातार यांनी या सर्व कोल्हापूरकरांसाठी उपलब्ध करून दिल्या आहेत. हे प्रदर्शन 13 व 14 ऑगस्ट या दोन दिवशी खुले राहणार आहे. यावेळी रूपाली नांगरे- पाटील, त्रिशला गांधी, ममता झंवर, मोनिका मोहिते, गायत्री मेनन, सुश्मिता सप्रे, स्नेहा दातार उपस्थित होते.


Leave a Reply