
माजी पंतप्रधान आणि भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते अटल बिहारी बाजपेयी यांचे आज वृध्दपकाळाने निधन झाले. ९३ वर्षीय बाजपेयींवर दिल्ली येथील एम्स् रुग्णालयात गेल्या नऊ आठवड्यापासून उपचार सुरु होते.
काल दुपारपासून त्यांची प्रकृती अधिकच खालवली होती. त्यांना कृत्रिम श्वासोच्छवास देण्यात येत होता. रात्री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रुग्णालयात जाऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती.
कालपासून पाच डॉक्टरांचे एक पथक सतत बाजपेयी यांच्या प्रकृतीची काळजी घेत होते, मात्र आज सकाळी त्यांचे सगळे प्रयत्न निष्फऴ ठरले, अखेर बाजपेयी यांची प्राणज्योत मावळली. त्याच्या निधनाने देश एका महान नेत्यास , मुत्सद्दी राजकारणीस मुकला अशी भावना व्यक्त केली जात आहे.
प्रखर देशभक्ती, नैतिक मुल्यांवर आधारीत राजकारण, करारी बाणा , निष्कलंक चारित्र्य ही त्यांची बलस्थाने होती. भारतीय जनता पक्षाचा संपूर्ण देशात विस्तार करण्यात बाजपेयींचे मोठे योगदान राहिले.
भारत – पाकिस्तान संबंध सुधारण्यासाठी पंतप्रधान असताना बाजपेयी लाहोरला प्रवासी बस घेऊन गेले, तसे आम्ही कमजोर नाही हे पोखरण अनुस्फोट चाचणीद्वारे जगाला ठणकावून सांगितले होते. त्यामुळेच इंदिराजीनंतरचे दुसरा कणखर नेता अशी बाजपेयींची जगमान्य ओळख निर्माण झाली.
Leave a Reply